• Wed. Jan 8th, 2025
    चालकाचं नियंत्रण सुटलं, ट्रॅक्स २०० फूट दरीत कोसळून भीषण अपघात; ठाण्यातील हृदयद्रावक घटना

    Thane Shahapur Accident News: या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने जखमींना सुरुवातीला कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले, मात्र जखमी पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यासह इतर २ जणांवर खर्डी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान चालक सुरेश ठोंबरे यांच्यासह झुगरे कुटुंबातील ७ जण जखमी झाले.

    हायलाइट्स:

    • भरधाव ट्रॅक्सवरील चालकाचं नियंत्रण सुटलं
    • ट्रॅक्स २०० फूट दरीत कोसळून भीषण अपघात
    • ठाण्यातील हृदयद्रावक घटना
    Lipi
    शहापूर ट्रॅक्स अपघात

    प्रदिप भणगे, ठाणे (शहापूर) : चालकाचं प्रवाशी वाहन असलेल्या जीप वरून नियंत्रण सुटल्याने प्रवाशी वाहन चालकासह २०० फूट दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १ प्रवासी ठार झाला असून ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील पालघर मार्गावरील असलेल्या विहीगाव खोडाळा गावाच्या हद्दीतील अप्पर वैतरणा धरणाच्या लगत असलेल्या दरीत घडली आहे. या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात अपघाताच्या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दादू जेठू झुगरे (वय ६९, रा. माळ गावठा, शहापूर तालुका) असं अपघातात ठार झालेल्या प्रवाशाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार. मृतक दादू जेठू झुगरे हे रेल्वे सेवेतून सेवा निवृत्त कर्मचारी होते. ते कुटूंबासह शहापूर तालुक्यातील कसारा भागात असलेल्या माळ गावठा राहत होते मृतक दादू हे काल ७ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील खोड गावात आपल्या मूळ गावी कुटूंबासह प्रवासी जीपने निघाले असतानाच कसारा भागातील विहिगावजवळील वळणादार रस्त्यावर वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट २०० फूट खोल दरीत कोसळली. खळबळजनक बाब म्हणजे अपघाताच्या स्थळावर खालच्या बाजूला अप्पर वैतरणा धरणाच्या काठावर असलेल्या खडकावर जाऊन प्रवाशी वाहन आदळले.
    Raj Thackeray : शिंदेंमुळे झालं हो सगळं! राज ठाकरेंच्या जवळच्या माणसाने बॉम्ब फोडला, दीड तासांच्या बैठकीत मोठी खलबतं

    या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने जखमींना सुरुवातीला कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले, मात्र जखमी पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यासह इतर २ जणांवर खर्डी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान चालक सुरेश ठोंबरे यांच्यासह झुगरे कुटुंबातील ७ जण जखमी झाले. त्यामध्ये सन्या ठाकरे, भारती झुगरे, उषा झुगरे, अती झुगरे, अंकिता झुगरे, आदित्य झुगरे, पातळी झुगरे अशी जखमींची नावे आहे. या घटनेची माहिती मिळताच शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, नायब तहसीलदार वसंत चौधरी, पोलीस निरीक्षक सुरेश गावित, पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी तसेच घटनस्थळाचा पंचनामा करीत पोलीस तपास सुरू केला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed