Devendra Fadnavis: या प्रकरणात कोणीही कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही कोणालाही वाचवू देणार नाही. या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी आणि हप्तेवसुली करतात, अशा सगळ्यांवर आम्ही जरब बसवण्याचे ठरवले आहे.
शहर भाजपच्यावतीने आयोजित पक्षाच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमानिमित्त नागपुरात रविवारी प्रसारमाध्यमांशी फडणवीस बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आंदोलनाबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले, ‘मोर्चे, आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. दमानिया यांची काहीही तक्रार असेल तर त्यांनी ती पोलिसांकडे द्यावी. पोलिस यावर निश्चित कारवाई करतील.’
तुम्ही मला चुना लावत आहात! NHAIच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर भडकले नितीन गडकरी, काय कारण?
या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याबद्दल विचारले असता, ‘राजकारणासाठी या प्रकरणाचा उपयोग होऊ नये. राजकारण करण्यापेक्षा समाजात सुधारणा कशी होईल, यासाठी प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करावेत’, असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.
तपोवन एक्स्प्रेसने घेतला ‘माणुसकीचा थांबा’! जखमी प्रवाशासाठी रेल्वे फिरली माघारी, पण…
भाजप सदस्यता नोंदणी मोहिमेबद्दल बोलले असता, ‘भाजपतर्फे महाराष्ट्रातील एक लाख बुथवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीड कोटी सदस्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ते नक्कीच पूर्ण होईल. नागपूर शहरातही २,२०० बुथवर २५ हजारांहून अधिक सदस्य केले आहेत’, अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.
पोटच्या मुलीला निर्घृणपणे संपविलं; अनैतिक संबंधांत अडसर ठरत असल्याने घेतला जीव; आईसह प्रियकराला अटक
पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या महारेल या स्वतंत्र्य कंपनीला सुरुवात झाल्यानंतर वर्षभरात रेल्वे क्रॉसिंगजवळील दोन पुलांचे काम लवकर होऊ लागले आहे. कंपनीच्या स्थापनेनंतर आता पूल बनण्यासाठी लागणारा कालावधी कमी झाला आहे. येत्या काळात कंपनीच्या माध्यमातून दोनशे पुलांचे काम पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्य शासन व महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे (महारेल) राज्यातील सात जिल्ह्यांमधल्या सात उड्डाणपुलांचा लोकार्पण सोहळा रविवारी झाला. त्यावेळी फडणवीस बोलत होते.