Anjali Damania: धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून माझा प्रचंड मानसिक छळ होत आहे. बीड जिल्ह्यातून अनेकांचे धमकीचे जवळपास ६०० ते ८०० कॉल आले, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.
हायलाइट्स:
- देशमुख हत्याप्रकरणी दमानिया यांची ठोस भूमिका
- कराडसह धनंजय मुंडे यांच्यावर थेट टीका
- मुंडे यांच्या कार्यकत्यांकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप
तपोवन एक्स्प्रेसने घेतला ‘माणुसकीचा थांबा’! जखमी प्रवाशासाठी रेल्वे फिरली माघारी, पण…
‘बीड जिल्ह्यातून मला अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत. नरेंद्र सांगळे नावाची व्यक्ती मला फोन करत आहे. ही व्यक्ती शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत आहे. चार दिवसांपासून मला सातशे ते आठशे लोकांचे फोन येऊन गेले,’ असा दावा दमानिया यांनी केला आहे. ‘फोनवर अश्लील भाषा वापरली. सुनील फड हे धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत. माझ्याविरोधात त्यांनी अश्लील कमेंट करण्यास सुरुवात केली आहे,’ असेही त्या म्हणाल्या.
पोटच्या मुलीला निर्घृणपणे संपविलं; अनैतिक संबंधांत अडसर ठरत असल्याने घेतला जीव; आईसह प्रियकराला अटक Nashik: जिल्हा रुग्णालयातून सात दिवसांचे बाळ चोरीला; भोंगळ कारभाराचा आणखी एक दाखला, CCTVमध्ये काही दृश्ये कैद
ते विधान कुठल्याही समाजाविरोधात नाही…
दमानिया यांनी काही दिवसांपूर्वीच वंजारी समाजाबाबत एक वक्तव्य केले होते. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले. ‘बीडमध्ये वरिष्ठ पदावर सर्व वंजारी समाजाचे लोक आहेत, असे मला अभ्यासातून समजले होते. वंजारी समाजाच्या लोकांना मोठ्या प्रमाणात प्रशासनात घेण्यात आले होते. काही काळाने त्या सर्वांना बीडमध्ये आणण्यात आले. हे विधान कुठेही समाजाविरोधात नव्हते. मी कधीही कोणत्याही समाजाविरोधात बोलत नाही,’ असे दमानिया यांनी स्पष्ट केले.