Nanded Ladki Bahin yojana News : नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये मिळणार असं सांगत भाजपने महिलांना सदस्य करुन घेतलं. नंतर महिलांना भाजप सदस्य झाल्याचा मेसेज आला. त्यानंतर महिलांनी फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे.
Ajit Pawar : ‘तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात’; भर सभेत अजितदादा का संतापले?
लोकसभा आणि विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन भाजपाने राज्यभरात सदस्य नोंदणी अभियान राबवण्यास सुरुवात केली. रविवारी सदस्य नोंदणीचा शेवटचा दिवस असल्याने नांदेड शहरासह जिल्ह्यात भाजपाने मोठे कॅम्प लावून सदस्य नोंदणी अभियान राबवले. माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे समर्थक सदाशिव पुरी यांनी देखील सांगवी भागात कॅम्प घेतले. भाजप सदस्य नोंदणी आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये नोंदणी अस बँनर लावले. लाडक्या बहिणीचे २१०० रुपये मिळणार या आशेने महिलांनी भाजपा सदस्य नोंदणी कॅम्पवर मोठी गर्दी केली.
Supriya Sule : महायुतीमध्ये केवळ फडणवीसच मिशन मोडवर काम करतात, बाकी सगळे…. सुप्रिया सुळेंचा कोणावर निशाणा?
नोंदणी केल्यानंतर महिलांच्या मोबाईलमध्ये लाडली बहीण योजनेच्या ऐवजी भाजप सदस्य नोंदणी झाल्याचा मॅसेज आला असा आरोप महिलांनी केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलांकडून संताप व्यक्त करत आयोजकाला जाब विचारण्यात आला, पण आयोजकाने योग्य उत्तर काही दिले नाही. दरम्यान सदस्य वाढीसाठी भाजपकडून लढवण्यात आलेल्या या शक्कलीची नांदेडमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ म्हणत भाजप सदस्य केलं, महिलांकडून फसवणूक झाल्याचा आरोप
दरम्यान, नांदेड दक्षिणमध्ये भाजपाच्या सदस्य नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख बाळू खोमणे यांच्या नेतृत्वात सदस्य अभियान मोहीम राबवली जातं आहे. रविवारी सराफा भोजालाल गवळी चौक येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सदस्य नोंदणीसह ऑटो आणि प्रतिष्ठाण तसेच घरावर स्टिकर्स लावण्यात आले. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्य बापू देशमुख, अमोल कुलथिया, मंडळ अध्यक्ष पुरभाजी कोमटवार, राज यादव, बालाजी पुणेकर यांच्या सह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.15 जानेवारी पर्यंत ही मोहीम राबवली जाणार आल्याचे बाळू खोमणे यांनी सांगितले