Mumbai News: केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचा ‘मुंबई ऊर्जा मार्ग ट्रान्समिशन’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्याने मागणी आणखी वाढली तरी मुंबईला अखंडित वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे.
मुंबईत वीजवाहिन्या मर्यादित आहेत. ‘मुंबई ऊर्जा मार्ग ट्रान्समिशन’ हा प्रकल्प कार्यान्वित होण्यापूर्वी मुंबईत महापारेषणच्या चार वाहिन्यांतून (प्रत्येकी ४०० केव्ही) कमाल ३२०० मेगावॉट वीजपुरवठा सुरू होता. मात्र, मुंबईच्या वीजमागणीने २०२४च्या उन्हाळ्यात ४३०० मेगावॉटचा उच्चांक गाठला होता. त्यामुळेच अतिरिक्त वीजवाहिन्यांचा प्रकल्प आता पूर्ण झाल्याने किमान दोन हजार मेगावॉट अतिरिक्त वीजपुरवठ्यास सुरुवात झाली आहे.
शेतकऱ्यांना दिलासा! जप्त केलेल्या हजारो एकर जमिनी मिळणार परत, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
या प्रकल्पात पडघा येथील ठप्प असलेलेल्या वीज उपकेंद्रातून अंबे (अंबरनाथ)पर्यंत ४०० किलोव्हॅट (केव्ही) क्षमतेच्या चार वीज पारेषण वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. तिथून पनवेलजवळील टेंभोडेपर्यंत दोन व खारघरपर्यंत दोन वाहिन्या आहेत. अंभोडेपर्यंत आलेल्या दोन वाहिन्याही तिथून पुढे खारघरलाच जोडण्यात आल्या आहेत. खारघरहून विक्रोळीपर्यंत अन्य प्रकल्पांमुळे दोन वाहिन्यांमधून वीजपुरवठा होत आहे. अशाप्रकारे पडघा ते अंबे, अंबे ते अंभोडे व अंभोडे ते खारघर आणि अंबे ते खारघर व पुढे विक्रोळी, अशा ४०० केव्ही क्षमतेच्या एकूण चार वाहिन्या ‘मुंबई ऊर्जा मार्ग ट्रान्समशिन’ या आंतरराज्य प्रकल्पात उभारण्यात आल्या आहेत. या पारेषण वाहिन्या अत्याधुनिक कंडक्टरच्या साह्याने बसवण्यात आल्याने त्या प्रत्येक वाहिनीची वीजवहन क्षमता १ हजार मेगावॉट इतकी आहे. त्यानुसार ४ हजार मेगावॉट वीज मुंबईत आणता येईल.
‘मुंबै’ बँकेवर पुन्हा मेहेरबानी? सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, महामंडळ गुंतवणुकीसाठी खाती उघडण्यास मान्यता
सध्याच्या मागणीनुसार त्यातून सध्या २ हजार मेगावॉट वीज खारघरपर्यंत व त्यानंतर तिथून विक्रोळीत येत आहे’, असे ‘मुंबई ऊर्जा मार्ग’ प्रकल्पाशी संबंधित उच्चाधिकाऱ्यांनी सांगितले. मलंगगड डोंगरावर आव्हानात्मक काम या प्रकल्पात अंबे ते अंभोडे व अंबे ते खारघर वाहिनी टाकताना मलंगगडच्या डोंगरावरील आव्हानात्मक कामाचा समावेश होता. त्या डोंगरावर मनोरे उभे करून, त्यानंतर डोंगर पार करून पलीकडे वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. या कामासाठी विशेष हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली होती. १,५०० मेगावॉट वीज देणेही शक्य या प्रकल्पातील वाहिन्या खारघरला आल्यानंतर तिथून कळवा, तळोजा व आपटा येथे २२० केव्ही क्षमतेच्या (५०० मेगावॉट) तीन वाहिन्या अतिरिक्त टाकण्यात आल्या त्यामुळे १,५०० विजेचे स्वतंत्रपणे शक्य झाले आहे.
Chhagan Bhujbal: कुणाचे तरी काढून मला मंत्रिपद नको! छगन भुजबळ मंत्रिपदाबाबत स्पष्टच बोलले
१५०० मेगावॉट वीज देणेही शक्य
या प्रकल्पातील वाहिन्या खारघरला आल्यानंतर तिथून कळवा, तळोजा व आपटा येथे २२० केव्ही क्षमतेच्या (५०० मेगावॉट) तीन पारेषण वाहिन्या अतिरिक्त टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे १५०० मेगावॉट विजेचे स्वतंत्रपणे वहन शक्य झाले आहे.