Dhananjay Munde: बीडच्या केजमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक झाली आहे. कराड मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय आहे. या प्रकरणात कराडचं नाव आल्यापासून भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस सातत्यानं मुंडे यांना लक्ष्य करत आहेत.
Walmik Karad: पोलीस कोठडीत पहिल्याच रात्री कराडची प्रकृती बिघडली; श्वास घेताना त्रास, ऑक्सिजन लावला
आकाचे आका धनंजय मुंडे असतील तर तुम्ही नाव घ्यायला का घाबरताय, असा प्रश्न मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत धस यांना विचारण्यात आला. त्यावर ‘मी संजय सिंघानिया आहे. माझी मेमरी शॉर्ट टर्म आहे. गझनी चित्रपट पाहिलाय का तुम्ही? मला कधी कधी त्यांचं नाव आठवत नाही. फक्त आकाचे आका एवढंच आठवतं,’ असं उत्तर धस यांनी दिलं. त्यांच्या या उत्तरानं एकच हशा पिकला.
‘गझनीमध्ये शॉर्ट टर्म मेमरी १५ मिनिटांची दाखवली होती. पण ती ५ मिनिटांचीदेखील असते ना. ५ मिनिटांपूर्वी मी बोलत होतो, तेव्हा त्यांचं नाव माझ्या लक्षात होतं. आता ५ मिनिटांनी विसरलो,’ असं धस पुढे म्हणाले. त्यांचं उत्तर ऐकून एकच खसखस पिकली.
Walmik Karad: कराड २२ दिवस कुठे होता? चौकशीतून महत्त्वाचा उलगडा; ठाकरेंच्या शिलेदाराचा दावा १००% खरा ठरला
तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. म्हणून मुंडेंचं नाव घेऊ नका असं तुम्हाला सांगण्यात आलंय का?, असा उपप्रश्न धस यांना विचारण्यात आला. ‘या प्रकरणात विरोधी पक्षातील नेतेही बोलत आहेत. आम्ही सत्ताधारी असलो तरी इतक्या क्रूर पद्धतीनं व्यक्तीला मारलं जात असेल, तर मी गप्प बसणार नाही. आकाचे आका आणि त्यांची बहीण यावर मी आधी बोललो. एका प्रश्नाला उत्तर दिलं. ते दोघे आता एकत्र झाले आहेत. त्याआधी ते एकमेकांच्या विरोधातही लढलेले आहेत ना. माझी लाँग टर्म, शॉर्ट टर्म आहे, त्यानुसार जितकं आठवतं, त्यानुसार ते एकमेकांच्या विरोधातही लढलेले आहेत,’ असं धस म्हणाले.