Authored byमानसी देवकर | Contributed byनयन यादवाड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम9 Jan 2025, 7:30 pm
छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्शाने पावन झालेला विशाळगड तब्बल सहा महिन्यानंतर पर्यटकांसाठी खुला झाला आहे. जुलै २०२४ मध्ये काही शिवप्रेमींनी विशाळगड मुक्ती आंदोलन केलं, पण या मोहिमेला हिंसक वळण लागल्याने गेल्या सहा महिन्यांपासून गडावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. सर्व व्यवहार ठप्प झाले होते. मात्र आता नियम आणि अटी घालत प्रशासनाने पर्यटकांना गडावर जाण्यास परवानगी दिली आहे. सहा महिन्यानंतर सध्या गडावर काय परिस्थिती आहे, जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडिओ.