पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलंय.आरोपी या पोलिस स्थानकात आल्यानंतर बुधवारी पाच गाद्या आणि पाच नवे कोरे बेड आणण्यात आले.हे बेड आरोपीसाठी आणण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय.यावर बीड पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.आमच्या गार्डने मागणी केली होती असं सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.वारंवार वरिष्ठ अधिकारी भेट देत आहेत,कुठली स्पेशल स्टेटमेंट आरोपींना देत नाही असंही स्पष्ट केलं.