Nagpur Crime News: नागपुरात पोलिसांनी थर्टी फर्स्टला केलेला नाकाबंदीदरम्यान दोन तरुणांकडून तब्बल ४१ लाखांची रोकड जप्त केली आहे. या घटनेने नागपुरात एकच खळबळ माजली आहे.
दोन तरुण संशयास्परित्या गाडीवरुन जाताना दिसले
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास शिवाजी महाराज पुतळा परिसरात दोन तरुण स्कूटरवरून जात असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांच्या वाहनाची तपासणी केली. तेव्हा त्यांच्याकडे ही रोकड सापडून आली.
न्यू इयरनिमित्त नागपुरात कडेकोट बंदोबस्त
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरात नववर्षाच्या सेलिब्रेशला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त लावला होता. शहरातील प्रमुख मार्गांवर नाकाबंदी केली होती. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची पोलिसांकडून बारकाईने तपासणी करण्यात येत होती.
गाडी तपासली अन् ४१ लाखांची रोकड सापडली
या दरम्यान, शिवाजी पुतळ्याजवळ दोन तरुण मोपेडवरून संशयास्पदरित्या जाताना दिसले. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर संशय आला आणि त्यांनी त्या तरुणांना थांबवलं. गाडी थांबवून पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यात सुमारे ४१ लाख ६७ हजरा ३०० रुपयांची रोकड आढळून आली. या रोख रकमेसंदर्भात कोणतेही ठोस कागदपत्र सादर करता न आल्याने पोलिसांनी या दोन तरुणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम जप्त केली आहे.
प्राथमिक तपासात ही रोकड हवालाशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांना आहे. रोहित गुलाबचंद कोरी आणि संगम रघुवर प्रसाद कोरी नावाचे तरुण हे दोघेही मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी असून त्यांच्याकडे ही रोकड सापडली असल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे सापडलेली रक्कम संदिग्ध आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, या रकमेचा स्रोत आणि ती कोणत्या उद्देशाने घेऊन जात होते. याप्रकरणी आता कोतवाली पोलीस अधिक तपास करत आहेत.