Authored byमानसी देवकर | Contributed byअभिजित दराडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम1 Jan 2025, 9:04 pm
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी आलेल्या जितेंद्र आव्हाडांनी महायुतीवर टीका केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कोरेगाव भीमाला येण्याची गरज नाही, असा टोला आव्हाडांनी लगावला. तर वाल्मिक कराड यांच्या अटकेबाबत देखील आव्हाडांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कराड पोलिसांना सांगून सरेंडर झाला, हे आत्मसमर्पण होतं की तह असा प्रश्न त्यांनी केला. आका म्हणजे मुंडे असून त्यांचा राजीनामा घ्या, असा हल्लाबोलही यावेळी आव्हाडांनी केला.