Santosh Deshmukh: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडीनं हाती घेतला आहे. या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडनं काल पुण्यात सीआयडी मुख्यालयात आत्मसमर्पण केलं.
सरपंच संतोष देशमुख यांची ८ डिसेंबरला अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे फरार आहेत. यापैकी आंधळेवर २०२३ मध्ये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा धारूर पोलीस ठाण्यात दाखल झाला. तेव्हापासूनच तो फरार आहे. त्याला वर्षभरात पोलिसांनी अटक का केली नाही, हा प्रश्न आहे. त्याला अटक झाली असती, तर कदाचित देशमुख यांची हत्या टळू शकली असती.Walmik Karad: कराड २२ दिवस कुठे होता? चौकशीतून महत्त्वाचा उलगडा; ठाकरेंच्या शिलेदाराचा दावा १००% खरा ठरला
फरार असलेल्या सुदर्शन घुलेला २०२३ मध्ये हत्येच्या प्रयत्नात अटक झाली होती. मग त्याला जामीन मिळाला. त्यामुळे त्याची तुरुंगातून सुटका झाली. घुलेच्या जवळच्या लोकांच्या चौकशीतून ही माहिती समोर आलेली आहे. सध्या सीआयडीकडून अटकेत असलेल्या आरोपींचे जबाब नोंदवले जात आहेत. आरोपींची बॅंक खाती गोठवण्यात आलेली आहेत. यासाठी आतापर्यंत १३ ते १५ बँकांना पत्रं देण्यात आलेली आहेत. पैकी सर्वाधिक बँका परळीमधील आहेत.
या प्रकरणातील हायप्रोफाईल आरोपी वाल्मिक कराड काल पुण्यात सीआयडीसमोर हजर झाला. २२ दिवसांपासून त्याचा शोध सुरु होता. तो पोलिसांना, सीआयडीच्या पथकांना गुंगारा देत होता. तब्बल ३ आठवडे तो तपास यंत्रणांच्या हाती लागला नाही. अखेर काल त्यानं आत्मसमर्पण केलं. पुण्यातील सीआयडी मुख्यालयात त्यानं शरणागरती पत्करली. गेले २२ दिवस कराड नेमका कुठे होता, याची माहितीदेखील आता समोर आलेली आहे.Walmik Karad: पोलीस कोठडीत पहिल्याच रात्री कराडची प्रकृती बिघडली; श्वास घेताना त्रास, ऑक्सिजन लावला
विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना वाल्मिक कराड नागपुरातच होता. विशेष म्हणजे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना उबाठाचे नेते यांनी विधिमंडळात बोलताना कराड नागपुरातच असल्याचा, तो एका फार्म हाऊसवर लपून बसल्याचा खळबळजनक दावा केला होता. पण आता हा दावा खरा ठरल्याचं दिसत आहे. फरार झाल्यानंतर सुरुवातीला पुणे गाठणारा वाल्मिक कराड अधिवेशन काळात नागपुरात मुक्कामास होता.
केजमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरु लागताच वाल्मिक कराड फरार झाला. त्यानं बीड सोडलं आणि पुणे गाठलं. आठ दिवसांपूर्वी तो राज्याबाहेर गेला. तो सुरुवातीला गोव्यात होता. त्यानंतर तो कर्नाटकला गेला. मग तो अन्य राज्यंही फिरला.