बीडच्या सरपंच प्रकरणात चर्चेत असलेल्या वाल्मिक कराडांना अटक झाली आहे. यासंदर्भात मनोज जरांगे यांनी नांदेडमध्ये मोठे विधान केले आहे. वाल्मिक कराडला अटक झाली, आता मोठे मासे देखील सापडतील असे जरांगे म्हणाले. यात धनंजय मुंडेंचा सहभाग आहे की नाही हे देखील चौकशीतून समोर येईल असेही ते म्हणाले. तर मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा, अन्यथा राज्य बंद पाडणार असा इशाराही त्यांनी दिला.