Walmik Karad: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमधील आरोपी वाल्मिक कराडला केजमधील न्यायालयानं १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वाल्मिक कराडनं काल पुण्यातील सीआयडी मुख्यालयात आत्मसमर्पण केलं. तिथे त्याची काही तास चौकशी करण्यात आली. यानंतर त्याला संध्याकाळी बीडमधील सीआयडी युनिटच्या ताब्यात देण्यात आलं. रात्री त्याला न्यायालयात हजर केलं गेलं. न्यायालयानं त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली. पण कोठडीतील पहिल्याच रात्री त्याची तब्येत बिघडली. डॉक्टरांच्या पथकानं त्याची तपासणी केली.
Walmik Karad: गुन्हा घडला तेव्हा वाल्मिक अण्णा..; शरण येताना कराड सोबत असलेल्या नगरसेवकाचा भलताच दावा
कराडला मधुमेहाचा त्रास आहे. काल रात्री त्यानं केवळ अर्धी पोळी खाल्ली. त्यानंतर सकाळीदेखील त्यानं नाश्ता केला नाही. रात्रीच्या सुमारास त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. याची माहिती त्यानं पोलिसांना दिली. त्यानंतर डॉक्टरांच्या पथकानं त्याची लगेचच तपासणी केली. त्याला काही वेळ ऑक्सिजनही लावण्यात आला. आता तब्येत रात्रीच्या तुलनेत बरी आहे.
Walmik Karad: कराड २२ दिवसांनंतर प्रकटला; शरणागतीतून काय काय साधलं? विरोधकांनी ‘त्या’ भेटीकडे लक्ष वेधलं
गेल्या २ तासांपासून कराडची सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. सीआयडीचे एसीपी सचिन पाटील थोड्याच वेळात त्याची चौकशी करणार आहेत. केजच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील ३ आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध लागलेला नाही. त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी कराडची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.
गेल्या २० दिवसांपासून वाल्मिक कराडचा शोध सुरु होता. आधी पोलीस आणि मग सीआयडीची पथकं त्याचा शोध सुरु होता. खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर कराडनं सोशल मीडियावर एक पोस्ट केला. त्यावेळी तो मध्य प्रदेशातील उज्जैनला होता. देवदर्शन केल्यानंतर त्यानं ४ जणांसोबत एक फोटो काढला. विशेष म्हणजे त्यातील दोघे जण पोलीस कर्मचारी होते. कराडला पोलिसांनी संरक्षण पुरवलं होतं. या पोलीस संरक्षणातून तो फरार झाल्यानं आश्चर्य व्यक्त झालं. पोलीस सुरक्षा असताना कराड कसा पळाला, त्याला इतके दिवस अटक का झाली नाही, त्याला नेमका आशीर्वाद कोणाचा, असे प्रश्न विचारले गेले. विशेष म्हणजे सीआयडीच्या पथकांनाही तो सापडला नाही. एका खासगी कारमधून त्यानंच सीआयडी मुख्यालय गाठलं आणि आत्मसमर्पण केलं.