Raigad News :पोलादपूर तालुक्यातील २०२१ च्या साखर सुतारवाडीतील भूस्खलनावेळी मयत झालेल्या दोन विद्यार्थिंनींच्या पालकांना, कोणत्याही प्रकारचे सानुग्रह अनुदान देण्याबाबत शिक्षणविभागाने कार्यवाही केली नाही. तसेच अन्य एका विद्यार्थिनीला सातवी इयत्तेमध्ये असूनही शैक्षणिक नोंदीअभावी पुन्हा पाचवी इयत्तेमध्ये शिकण्यास सांगण्यात आले.
पोलादपूर तालुक्यातील २०२१ च्या साखर सुतारवाडीतील भूस्खलनावेळी मयत झालेल्या दोन विद्यार्थिंनींच्या पालकांना, कोणत्याही प्रकारचे सानुग्रह अनुदान देण्याबाबत शिक्षणविभागाने कार्यवाही न केल्याने तसेच, अन्य एका विद्यार्थिनीला सातवी इयत्तेमध्ये असूनही शैक्षणिक नोंदीअभावी पुन्हा पाचवी इयत्तेमध्ये शिकण्यास सांगण्यात आल्याच्या दोन प्रमुख मुद्दयांसह, अनेक शैक्षणिक समस्यांची जंत्री यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाअध्यक्ष ओंकार मोहिरे यांनी तसेच मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. याकरिता प्रभारी गटशिक्षणाधिकारी वसावे आणि शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष साळुंखे यांनी रायगड जिल्हा परिषदेतून भोपळे व अन्य अधिकारी शिक्षण विभागातून येणार होते. मात्र, लोणेरे येथूनच ते काही महत्वाच्या कामासाठी पुन्हा जिल्हा परिषदेकडे रवाना झाल्याने मनसे आणि मनविसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी आक्रमक झाले.
यावेळी जिल्हा मनसे सचिव अमोल पेणकर, पोलादपूर तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर, शहरअध्यक्ष राकेश सलागरे, शहर उपाध्यक्ष प्रफुल्ल पांडे, मुश्ताक मुजावर, तुषार पवार, गणेश कासुर्डे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाअध्यक्ष ओंकार मोहिरे, शहर उपाध्यक्ष आदेश गायकवाड, शहर सचिव निखिल वनारसे, संपर्क अध्यक्ष सूरज कदम, अभय मोरे, विशाल पवार, ओम महाडीक,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाड तालुकाअध्यक्ष अथर्व देशमुख आदी उपस्थित होते.
पोलादपूर नगरपंचायतीमध्ये सुस्त प्रशासनाला ‘अलार्म’ आणि ‘बदाम’
मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्हा कार्यकारिणीतील निर्णयानुसार पोलादपूर नगरपंचायतीमध्ये सुस्त प्रशासनाला ‘अलार्म’ वाजवून तसेच ‘बदाम’ खायला देऊन अभिनव आंदोलन केले. पोलादपूर तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर, शहरअध्यक्ष राकेश सलागरे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाअध्यक्ष ओंकार मोहिरे, शहर उपाध्यक्ष आदेश गायकवाड तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन नगरपंचायतीच्या प्रशासनाला निवेदन दिले.