महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आई मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे २९ डिसेंबर रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. मीराबाई पटोले यांच्या पार्थिवावर भंडारा जिल्ह्यातील सुकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आईला अखेरचा निरोप देताना नाना पटोले यांच्या अश्रूंचा बांध फुटला.पटोले कुटुंबियांना आधार देण्यासाठी स्थानिक नागरिक आणि कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सुकळी येथे उपस्थित होते.