सोमवारी (६ जाने.) आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी ६ रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले. मात्र यावरून खासदार संजय जाधव यांनी बोर्डीकरांना टोला लगावलाय. जिल्ह्यातील रुग्णवाहिका आधीच धूळ खात पडल्या असल्याचं जाधव यांनी सांगितलं. ड्रायव्हरअभावी रुग्णवाहिका आरोग्य केंद्रात पडून असल्याचे देखील ते म्हणाले. त्यामुळे आधी ड्रायव्हर उपलब्ध करावे, असा सल्ला जाधवांनी बोर्डीकरांना दिला.