Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी
२. कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआरझेड) आणि नो डेव्हलपमेंट झोन (एनडीझेड) जमिनींना विकसित करण्यायोग्य बनवण्यासाठी मालमत्तेच्या नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार केल्याचा जमीन घोटाळा समोर आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने चौघांना अटक केली असून, यामध्ये दोन माजी सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
३. ‘मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करत असताना आरोपींच्या डोळ्यात कोणतीही भीती किंवा पश्चाताप दिसून येत नाही. तसेच, आरोपी गुन्हा करत असताना असुरी आनंद लुटत असल्याचे डिजिटल पुराव्यांमध्ये दिसत आहे. या अनुषंगाने या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची गरज आहे,’ असे म्हणणे पोलिसांनी सोमवारी न्यायालयात मांडले. बातमी वाचा सविस्तर…
४. उपमुख्यमंत्री अजित पवार परदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी रात्री त्यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली. कामकाजाच्या आढाव्याबाबत अजित पवारांची भेट घेतली, बीड घटनेबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे मुंडे यांनी सांगितले. अजित पवार यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण आलो होतो, असेही ते म्हणाले. परंतु यावेळी धनंजय मुंडेंनी अजितदादांकडे मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केल्याची चर्चा रंगली आहे.
५. मराठी सिनेसृष्टी मधले नामावंत दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांना ओळखले जाते. त्यांनी आजवर अनेक उत्तमोत्तम कलाकृती सादर केल्या आहेत. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आले.
६. शिवमंदिरात अभिषेक पूजा करायची आहे म्हणून घरून शहाळे (नारळ) आणण्यासाठी गेले ते परतलेच नाही. पूजेसाठी शहाळं घ्यायला गेले आणि झाडावरील एक शहाळं येऊन डोक्यावर पडल्याने एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील राजपुरी येथे ही हृदयद्रावक घटना घडल्याची माहिती आहे. जयेश पांडुरंग गीते (वय ४८ वर्षे, तालुका – मुरुड जंजिरा) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांच्या मृत्यूची वार्ता गावात पोहचताच परिसरातून एकच हळहळ व्यक्त होत आहे.
७. ‘लाडकी बहीण योजना ही यशाची गुरुकिल्ली ठरली आहे. महिलांच्या भावविश्वाशी जोडली गेलेली ही योजना बंद करणे हा महिलांशी केलेला द्रोह ठरेल. त्यामुळे कोणीही संवेदनशील राजकारणी ही योजना बंद करण्याचा निर्णय घेणार नाही,’ असा निर्वाळा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिला. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीच्या चौदाव्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला पाटील यांनी ‘मटा’च्या कार्यालयाला भेट देऊन संवाद साधला. बातमी वाचा सविस्तर…
८. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे पाच माजी नगरसेवक कार्यकर्त्यांसह भाजपचा झेंडा हाती धरत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.
९. नागपुरात एचएमपीव्ही व्हायरसचे दोन रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. दोन लहान मुलं एचएमपीव्ही पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. एक ७ वर्षीय मुलगा आणि १३ वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. ३ जानेवारीलाच यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात चिंता वाढली आहे. हे एचएमपीव्हीचे राज्यातील पहिले दोन रुग्ण आहेत.
१०. दुनियादारी या चित्रपटातून चर्चेत आलेला अभिनेता सुशांत शेलार सध्या राजकारणामुळे चर्चेत असतो. त्याचा अभिनयातला वावर कमी झाला असला तरीही राजकारणात मात्र तो बराच सक्रिय झाला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. तो बरेचदा एकनाथ शिंदे यांचा प्रचार करताना सुद्धा दिसला आहे. याशिवायतो शिव चित्रपट सेनेचा अध्यक्ष आहे.