संतोष देशमुख प्रकरण राज्यभर गाजत आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या मागणीदरम्यान सोमवारी धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेत राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र अजित पवार यांनी कोणतेही पुरावे अद्याप समोर न आल्याने राजीनामा स्वीकारला नसल्याचं बोललं जात होतं. अशतातच यावर स्वत:धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.