• Wed. Jan 1st, 2025
    सात वर्षाच्या मुलीवर 22 वर्षीय व्यक्तीकडून अत्याचार

    Raigad News : रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यात 22 वर्षीय नराधमाने सात वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी हा फरार झालाय. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अमुलकुमार जैन रायगड : रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील एका गावात बावीस वर्षीय नराधमाकडून सात वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. आरोपी हा फरार झाला असून पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली चार ते पाच पथक नेमले असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस विभागाकडून मिळाली आहे. मात्र, या घटनेने लोकांना मोठा धक्का बसलाय. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी आता केली जातंय.

    रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील एका गावात सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या घराजवळ असलेल्या समुद्रकिनारी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईनी रेवदंडा पोलिस ठाण्यात दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुरुड तालुक्यातील एका गावात 27 डिसेंबर 2024 रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास सात वर्षीय पीडित मुलगी ही तिचा भाऊ आणि बहीण यांच्यासोबत शौचास गेली होती.
    Chhatrapati Sambhajinagar: कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल, विवाहितेची पोटच्या चिमुलकीसह विहिरीत उडी; छ.संभाजीनगर हादरलंसदर ठिकाणी आरोपीने येऊन पिडीत मुलीला समुद्रकिनारी उभ्या केलेल्या एका बोटीत घेऊन जाऊन तिच्यावर शारिरीक अत्याचार केले. याबाबत रेवदंडा पोलिस ठाण्यात 27 डिसेंबर 2024 रोजी रात्री अकरा वाजून 32 मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबत आरोपीकडून मुलीला मारहाण देखील करण्यात आली. घरी कोणालाही सांगायचे नाही, असे आरोपीने मुलीला सांगितले होते. याबाबत अधिक तपास मुरुड पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक एम. टी. शिंदे या करीत आहेत.

    बावीस वर्षीय नराधम यांच्यावर यापूर्वी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. काही दिवसापूर्वी कल्याणमध्ये देखील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रकार घडला होता. अशा घटनेतील आरोपी यांना शासनाने कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि हा खटला जलदगतीने न्यायलायत चालविण्याची मागणी सामजिक कार्यकर्ती रुपाली पेरेकर यांनी केली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच मुरुड पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठवून सदर पीडित मुलीची चौकशी करण्याची सूचना केली आहे.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed