• Wed. Jan 1st, 2025
    Ulhasnagar Murder: मद्यधुंद तरुणाचा राडा, गोंधळाला आलेल्या तरुणाची गळ्यात चाकू भोसकून हत्या

    Ulhasnagar Youth Murder: रेमंड शोरुमच्या समोर मद्यधुंद उन्माद तरुण सचिन दिघे उर्फ बाबल्या याने गोंधळाला आलेल्या पंकज निकम यांची गळ्यात चाकू भोसकून हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मध्यवर्ती पोलिसांनी बबल्याला अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत.

    हायलाइट्स:

    • गोंधळाला आलेल्या एका तरुणाची हत्या
    • तरुणाने चाकू भोसकून हत्या केली
    • उल्हासनगरमधील धक्कादायक घटना
    Lipi
    उल्हासनगर तरुणाची हत्या

    प्रदिप भणगे, ठाणे (उल्हासनगर) : उल्हासनगरमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गोंधळाला आलेल्या एका तरुणाला दुसऱ्या तरुणाने चाकू भोसकून हत्या केली आहे. उल्हासनगर कॅम्प तीनमध्ये हा प्रकार घडला असून एकच खळबळ माजली आहे.रेमंड शोरुमच्या समोर मद्यधुंद उन्माद तरुण सचिन दिघे उर्फ बाबल्या याने गोंधळाला आलेल्या पंकज निकम यांची गळ्यात चाकू भोसकून हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मध्यवर्ती पोलिसांनी बबल्याला अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत.
    ‘कोणासोबतही कलाकाराचं नाव जोडू नका’, गौतमी पाटीलचे स्पष्ट उत्तर; म्हणाली- ‘प्राजक्ता ताई…’

    उल्हासनगर कॅम्प तीनमध्ये रेमंड शोरूमच्या समोर गहुबाई पाडा आहे. गहुबाई पाड्यात जागरण गोंधळाला आलेल्या जावई पंकज निकम हा रात्री दोन वाजताच्या सुमरास ॲक्टिवा मोटरसायकल वरुन जात होता. त्यावेळी नाक्यावर दारुच्या नशेत धुंद असलेला सचिन आनंद दिघे उर्फ बबल्या याने त्याला अडवले. पहिले लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. त्याच्या खांद्यावर हात ठेवत खिश्यातील चाकू काढून गळ्यात घुसवला. अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मध्यवर्ती पोलीसांनी बबल्याला अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed