Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी
२. भारतीय अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. नितीशने हे शतक ज्या पद्धतीने साजरे केले त्याची चौफेर चर्चा होत आहे. शतक झळकावल्यानंतर त्याच्या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता या २१ वर्षीय स्टार फलंदाजाने या सेलिब्रेशनबाबत मोठा खुलासा केला आहे. नितीशने सेलिब्रेशनमागचे मोठे कारणही सांगितले.
३. गोरेगाव तालुक्यातील हेटी येथे तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत चिमुकलीच्या मोठ्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि गावातील स्शानभूमीत पुरलेला तिचा मृतदेह २४ तासानंतर बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. संशयाच्या आधारे पोलिसांनी चिमुकलीच्या सख्ख्या आईला ताब्यात घेतले आहे.
४. ‘स्मृतिस्थळाऐवजी निगमबोध घाटावर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करून केंद्र सरकारने त्यांचा अपमान केला आहे,’ असा आरोप काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. ‘एक्स’ या समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमधून राहुल यांनी सरकारच्या निर्णयाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपने मात्र या टीकेची संभावना घाणेरडे राजकारण अशी केली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या यांनीही आपल्या वडिलांबाबत काँग्रेस कसा वागला होता, याची आठवण करून देऊन खडे बोल सुनावले.
५. कुटुंबात झालेल्या वादानंतर रागाच्या भरात २९ वर्षीय विवाहितेने ४ वर्षाच्या चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवार दिनांक 28 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील वरखेड शिवारात उघडकीस आली. या प्रकरणी माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
६. महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आई मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज रविवारी पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पटोले कुटुंबावर शोककळा पसरली आहे. बातमी वाचा सविस्तर…
७. हिवाळ्याचे दिवस असल्याने पहाटे चुलीजवळ बसून अभ्यास करीत असलेल्या एका विद्यार्थिनीचा जळाल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी मरामजोब या गावात घडली. चांदणी किशोर शहारे (वय १७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
८. येवला तालुक्यात शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्रीच्या सुमारास सुमारे अर्धा ते एक तास झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीपाठोपाठ अवकाळी पावसाच्या फटक्याने बळीराजाला हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने तालुक्यातील कांदा, मका, गहू ही रब्बी पिके संकटात सापडली आहेत.
९. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बाॅक्सिंग डे कसोटी मेलबर्न येथे खेळवली जात आहे. कसोटीच्या पहिल्या डावात सॅम कॉन्स्टन्सने जसप्रीत बुमराहसह इतर भारतीय गोलंदाजांविरुद्ध खूप धावा केल्या. आता बुमराहने या १९ वर्षीय खेळाडूचा बदला घेतला आहे. चौथ्या दिवशी भारताचा पहिला डाव ३६९ धावांवर आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने १०५ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात जेव्हा कॉन्स्टन्स फलंदाजीला आला तेव्हा बुमराहने पहिल्याच षटकापासूनच त्याची विकेट काढण्याचा प्रयत्न केला. कॉन्स्टन्सला बाद केल्यानंतर बुमराहने जे सेलिब्रेशन केले ती पद्धतही व्हायरल होत आहे.
१०. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील एका गावात बावीस वर्षीय नराधमाकडून सात वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. आरोपी हा फरार झाला असून पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली चार ते पाच पथक नेमले असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस विभागाकडून मिळाली आहे. मात्र, या घटनेने लोकांना मोठा धक्का बसलाय. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी आता केली जातंय. बातमी वाचा सविस्तर…