• Fri. Dec 27th, 2024
    चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भाविकांची बस नदीत उलटली; अपघातात ६ प्रवासी जखमी, बचाव कार्य सुरु

    Akola Accident: बाळापुरात एका खासगी बसला अपघात झाला आहे. भुसावळहून वाशिमला जाणारी बस अपघातग्रस्त झाली आहे. यात्रा करून भुसावळला उतरलेल्या वाशिम येथील भाविकांची ही खाजगी बस होती.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    – प्रियांका जाधव

    अकोला: रामलल्लाचं दर्शन घेऊन अयोध्येतून घरी परतत असलेल्या वाशिम येथील भाविकांची खासगी लक्झरी बस नदीपात्रात उलटल्याची घटना बाळापूर नजीक असलेल्या भिकुंड पुलाजवळ आज साडेसात वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. तर इतर प्रवासी सुखरुप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ग्रामस्थांच्या मदतीनं सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.

    अकोला ते बाळापूर दरम्यान असलेल्या भिकूंड नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला. येथे एक खासगी बस थेट नदीपात्रात कोसळली. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी संध्याकाळी साडेसा त वाजताच्या सुमारास वाशिम येथील श्री मुर्डेश्वर कंपनीची एम एच ३७ बी ४९९९ ही खासगी बस भुसावळ येथून खामगाव मार्गे वाशिमकडे जात होती. ही बस पारस फाट्यावरून बाळापूरच्या दिशेने जात असताना उतारावरून थेट भिकुंड नदीपात्रात उलटली. त्यावेळी या बसमधून ५० प्रवासी प्रवास करत होते. या घटनेत जीवितहानी नसली तरी एका चिमुकलीसह सात प्रवाशी जखमी झाले आहेत.
    घटनास्थळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी भेट दिली आणि जखमींची विचारपूस करण्यात आली.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed