Cable Taxi in Mumbai Thane : प्रवाशांना वाहतूककोंडीपासून दिलासा मिळावा यासाठी केबल टॅक्सी हा चांगला पर्याय असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. काय आहे त्यांची योजना?
मुंबई – पुण्याचं अंतर कमी होणार; खोपोलीजवळ देशातील सर्वात उंच केबल ब्रिज मिसिंग लिंक, इतक्या तासात होणार प्रवास
परदेशात केबल टॅक्सीची सुविधा
सध्या परदेशात केबल टॅक्सीची सुविधा आहे. प्रताप सरनाईक यांनी केलेल्या घोषणेनंतर काम पुढे वाढत गेल्यास लवकरच मुंबई – ठाणेकरांना प्रवासासाठी नवीन साधन उपलब्ध होऊ शकतं.
जोगेश्वरी – ठाणे दीड तासाचं अंतर २० मिनिटांत पार, गोरेगाव – मुलुंड लिंक रोडचं काम कधी पूर्ण होणार? एका गोष्टीने कामात अडथळा
काय आहे प्रताप सरनाईक यांची योजना?
परिवहन मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सरनाईक म्हणाले की, केबल टॅक्सी ही मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) वाहतुकीसाठी लोकप्रिय ठरू शकते. सध्या महाराष्ट्रात कुठेही केबल टॅक्सी नाही. प्रताप सरनाईक यांनी सांगितलं, की आपण १५ किंवा २० सीटर केबल टॅक्सी चालवली, तर आपल्याला ट्रॅफिकपासून मुक्तता मिळू शकते. जर आपण मेट्रो चालवू शकतो, तर केबल टॅक्सी चालवण्यास कोणतीही समस्या नाही. केबल टॅक्सीसाठी रोप वे बनवण्यासाठी अधिक जमीनीची गरज लागणार नाही.
कुर्ला – बीकेसी मार्गावर पॉड टॅक्सी कधी सुरू होणार? जाणून घ्या कसा असेल मार्ग आणि किती असेल भाडं?
गडकरींनीही केलेला केबल टॅक्सीचा उत्तम वाहतुकीचं साधन म्हणून उल्लेख
त्याशिवाय सरनाईक यांनी असंही सांगितलं, की महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अंतर्गत केबल टॅक्सी चालवल्या जाणार आहेत, त्यामुळे ही यंत्रणा व्यवस्थित चालेल. सरनाईक यांच्या आधी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही केबल टॅक्सी हे वाहतुकीचं उत्तम साधन असल्याचं सांगितलं होतं. केबल टॅक्सीला पॉड टॅक्सी देखील म्हणतात. केबल टॅक्सी वीज आणि सोलरवर चालतात. हे वाहतुकीचे अतिशय उत्तम आणि पर्यावरणपूरक साधन आहे.