• Wed. Dec 25th, 2024
    थर्टी फर्स्टची पार्टी रात्रभर, उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय, किती वाजेपर्यंत बार खुले?

    Beer Bar timing on 31st December : राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यालये उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. बिअरबार पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार आहे.

    महाराष्ट्र टाइम्स

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रात्री बाराच्या ठोक्याला तरुणांसह इतर वयोगटातील लोकही थिरकत असतात. हॉटेल्स, क्लब यांच्याकडून खास मद्यपार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. थर्टी फर्स्ट म्हणून ही रात्र साजरी केली जाते. हॉटेलकडूनही खास पॅकेज दिले जातात. या आनंदात कुठेच अडसर नको म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यालये उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. बिअरबार पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार आहे.

    सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षांचे स्वागत करण्यासाठी थर्टी फर्स्टची रात्र अविस्मरणीय ठरविण्यासाठी खास पार्ट्यांचे नियोजन करण्यात येते. देशी-विदेशी दारूंचा समावेश असलेल्या पार्ट्या रंगतात. नाताळ आणि नववर्षासाठी २४ डिसेंबर, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबरपर्यंत नियमात शिथिलता देण्यात आली आहे.
    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून अजमेर शरीफ दर्ग्याला चादर अर्पण; शिवसेनेची टीका, कधी साडी चोळी…
    वाईन शॉप (एफएल २) : सकाळी १० ते रात्री १ पर्यंत
    बिअर शॉपी : सकाळी १० ते रात्री १ पर्यंत
    बिअर बार : सकाळी ११ ते पहाटे ५ पर्यंत
    क्लब : सकाळी ११ ते पहाटे ५ पर्यंत

    Beer Bar : चिअर्स! थर्टी फर्स्टची पार्टी रात्रभर, उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय, किती वाजेपर्यंत बार खुले?

    लहान मुलांना दूर ठेवा

    मद्य परवान्याशिवाय कुणालाही मद्य विकत घेता येत नाही. असे असतानाही मद्यविक्रेते नियम डावलून मद्याची विक्री करीत असल्याचे वेळोवेळी पुढे आले. लहान मुलांना मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मद्य पार्ट्यांमध्ये लहान मुलांचा सहभाग नको, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आले.
    Nitesh Rane : जिहादी लोकांच्या कारवाया सागरी किनाऱ्यावर सुरु; मंत्रिपदाची सूत्रं हाती, नीतेश राणेंचा पहिला निर्धार

    साडेतीन कोटींचा मद्यसाठा जप्त

    अवैध मद्याचा वापर करणाऱ्यांवर उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. १ एप्रिल २०२४ ते २३ डिसेंबर २०२४ या ८ महिन्यांत ३ कोटी ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २ हजार २०२ आरोपींना अटक करण्यात आली. हरियाना आणि मध्यप्रदेश या राज्यांतून होणारी मद्याची तस्करी रोखण्यावर विशेष भर असून आतापर्यंत तीन मोठ्या कारवाया करण्यात आल्याचे उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed