• Wed. Sep 16th, 2026
आधी पत्नी गेली, तीन दिवसांनी लेकाची बॉडी सापडला, एक अपघात अन् पठाण कुटुंबावर काळाचा आघात

Child Died In Mumbai Nilkamal Boat Accident: मुंबईत झालेल्या नीलकमल बोट अपघातातील मृतांची संख्या आता १५ वर येऊन पोहोचली आहे. या अपघातात सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह आज सापडला आहे.

Lipi

अमुलकुमार जैन, रायगड: मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटा घारापुरीला निघालेल्या नीलकमल या प्रवासी फेरी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने बुधवारी (दिनांक १८ डिसेंबर) रोजी दुपारी जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात प्रवासी बोट समुद्रात बुडाली आणि प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. सात वर्षीय प्रवाशी जोहान निसार अहमद याचा मृतदेह मृतदेह तब्बल तीन दिवसांनंतर सापडला आहे. आता या अपघातातील मृताची संख्या ही पंधरावर पोहोचली आहे.

नौदल स्पीड बोटीच्या इंजिनची चाचणी करीत असताना अरबी समुद्रात उरण करंजाजवळ दुपारच्या सुमारास नौदलाच्या बोटीचे नियंत्रण सुटले आणि ती करंजा येथे नीलकमल या प्रवासी फेरी बोटीला धडकली. या दुर्घटनेत १ नौदल कर्मचारी, नौदलाचे दोन अधिकारी यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला असल्याची घोषणा १८ डिसेंबर २०२४ रोजी केली होती. तर दोन जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले होते. बेपत्ता असलेल्या दोघांपैकी हंसाराम भाटी यांचा मृतदेह हा काल सापडला होता. तर सात वर्षीय जोहान अहमद याचा मृतदेह हा आज सापडला आहे. अशी माहिती माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

जवळपास १२० च्या आसपास प्रवाशांना महेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या मालकीची असलेल्या नीलकमल बोट ही तीन दुपारी तीनच्या सुमारास गेट वे ऑफ इंडिया येथून घारापुरी एलिफंटा येथे जाण्यासाठी निघाली होती. दुपारी ३.५५ वाजता अचानक नौदलाच्या एका स्पीड बोटीने नव्या इंजिनची चाचणी घेत असताना या बोटीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यामुळे नीलकमल बोट कलंडली आणि बुडाली होती.

या बोट अपघात प्रकरणातील बेपत्ता असलेल्या दोघांचा शोधासाठी तटरक्षक दलाच्या बोटी व हेलिकॉप्टर याची मदत घेण्यात येत होता. ही शोधमोहिम आता थांबली असून आज चिमुकल्या जोहान अहमदचाही मृतदेह सापडला आहे. या अपघातात जोहान अहमदच्या आईचाही मृत्यू झाला आहे.

Mumbai Boat Accident: आधी पत्नी गेली, तीन दिवसांनी लेकाची बॉडी सापडला, एक अपघात अन् पठाण कुटुंबावर काळाचा आघात

हे पठाण कुटुंबीय गोवा राज्यातील म्हापसा येथून मुंबई येथे कामासाठी आले होते. १८ डिसेंबरला हे कुटुंब फिरायला निघालं, एलिफंटाच्या दिशेने जात असताना काळ स्पीड बोटचं रुप घेऊन आला आणि हसत्या खेळत्या कुटुंबाच्या मनावर आयुष्यभराच्या जखमा देऊन गेला. जोहान आपल्या आई-वडील लहान भाऊ आणि मावशीसोबत या बोटीवर होता. मात्र, बोट अपघातात त्याचा आणि त्याची आई सफियांना पठाण यांचा बुडून मृत्यू झाला. तर, वडील निसार पठाण, लहान भाऊ आणि मावशी बचावले आहेत. या घटनेने पठाण कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडाआणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed