नाना पटोलेंनी विधानसभेत केलेल्या वक्तव्यावरून वाद झालेला दिसला. पटोलेंनी शुक्रवारी गडचिरोलीतील नक्षलवादावरून प्रश्न उपस्थित केला. मात्र यावेळी त्यांनी टाटा-बिर्ला यांचाही उल्लेख केला होता. पटोलेंच्या वक्तव्यावर सभागृहात आक्षेप घेण्यात आला. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील यावर संतप्त प्रतिक्रिया दिली.