Sanjay Raut Marathi News : कल्याणमध्ये धूप लावण्याच्या वादातून परप्रांतीय व्यक्तीने मराठी माणसांना मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेवरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. शिवसेना फोडल्यामुळे मराठी माणूस कमजोर झाला असून, मुंबई आणि परिसर अमराठी बिल्डरांच्या घशात घालण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. मराठी माणसांवरील हल्ल्यांबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणीही राऊत यांनी केली.
मराठी माणसे घाणेरडी आहेत, त्यांन जगण्याचा अधिकार नाही. मराठी माणसांना जागा नाकारण्यात येत आहेत. लोढा, गुंडेचा लवकरच पुढे नावे घेईल. बाळासाहेब ठाकरेंनी मराठा माणसासाठी निर्माण केलेली शिवसेना नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी फोडून मराठी माणूस कमजोर केला. यासाठीच मराठी माणसाला दुय्यम दर्जीची वागणूक मिळावी आणि लढण्याची ताकद नष्ट व्हावी. ही मुंबई आणि आजूबाजूचा परिसर अदानी, लोढा, गुंडेचा अमराठी बिल्डर व्यापाऱ्यांच्या घशात घालावा यासाठी भाजपने मराठी माणसाला कमजोर केल्याची टीका संजय राऊतांनी केला आहे.
विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर मराठी माणसावरील हल्ले वाढले आहेत. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मराठी माणसाला बाहेर घालवायचे उद्योग सुरू आहेत. ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीतही मराठी माणसांनी राहू नये अशा प्रकारचं वातावरण केलं, याचं कारण शिवसेन फोडली. पण जे स्वत:ला शिवसेना समजत आहेत, मोदीं आणि शहांनी ज्यांना शिवसेना आणि चिन्ह ते सरकारमधील नामर्द लोकं आहेत त्यांना कल्याणमधील घटना टोचत आहे का? असा खोचक सवाल संजय राऊतांनी केला आहे.
आम्ही बघू काय करायचं ते? सत्तेसाठी ते लाचार असून, बाळासाहेब ठाकरेंची मराठी माणसाची संघटना फोडायला मदत केली हे लाचार आहेत. मला जेव्हा ईडीने अटक केली तेव्हा, महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा हे माझं वाक्य आहे. मराठी माणसाविषयी बोलणााऱ्या संघटना आणि व्यक्तीवरती हल्ले सुरू आहेत. हे फार मोठं राष्ट्रीय कारस्थान आहे. मुंबईचं गुजरातीकरण आणि उत्तर भारतीयकरण करायचं आणि मराठी माणसाला तडीपार करायचं. मराठी माणसावरील हल्ल्यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला पाहिजे. आपण महाराष्ट्राच्या मराठी माणसांचे प्रतिनिधी आहात ना, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. दोन उपमुख्यमंत्री आहेत, स्वत:ला कसले मराठी समजता, लाज वाटली पाहिजे, असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.