• Wed. Jan 8th, 2025
    नांदेडमध्ये ठाकरे गटाला खिंडार, आदित्य ठाकरे यांच्या विश्वासूसह अनेक शिवसैनिक अजित दादांच्या राष्ट्रवादीत

    Shivsena UBT leaders joins NCP Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तरच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखासह इतर शिवसैनिकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे.

    Lipi

    अर्जुन राठोड, नांदेड : विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तरच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखासह इतर शिवसैनिकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकला आहे. जिल्हाप्रमुख माधव पावडे, महानगर प्रमुख पप्पू जाधव यांच्या सह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. कट्टर शिवसैनिकांनी साथ सोडल्याने शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

    नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे माजी जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला नांदेड उत्तरमधून उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाने पावडे यांना उमेदवारी न देता अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी संगीता पाटील डक यांना उमेदवारी जाहीर केली. निष्ठावंताला सोडून अन्य संधी दिल्याने माधव पावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी नाराज होते. यासाठी निवडणूकीदरम्यान नाराज शिवसैनिकांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला. याच दरम्यान माधव पावडे यांना पदावरून हटवण्यात आले. त्यामुळे ते नाराज झाले होते.
    संतोष देशमुखांचे कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या दारी, न्यायाची मागणी; ‘मारेकऱ्यांना सोडणार नाही’ फडणवीसांनी दिला शब्द
    आज अखेर माधव पावडे यांनी शिवसेनेचे जिल्हा संघटक नेताजीराव भोसले महानगर प्रमुख पप्पू जाधव , तालुका प्रमुख गणेश शिंदे, युवा सेना जिल्हाप्रमुख बालाजी शिंदे , युवती सेना जिल्हाप्रमुख रोहिणी कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष पावडे, दर्यापूरचे सरपंच विलास सूर्यवंशी, युवा सेना शहर प्रमुख अभिजीत भालके, सभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे यांच्यासह अनेकांनी आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला.

    विशेष म्हणजे माधव पावडे हे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. पक्ष फुटीनंतरच ही माधव पावडे यांनी ठाकरे गटाची साथ सोडली नाही. मात्र सलग विधानसभा निवडणुकीत दोन वेळा उमेदवारी नाकारल्याने अखेर पावडे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत सोडचिठ्ठी दिली. दरम्यान नांदेडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अनेकजण राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed