बारामतीत पुन्हा एकदा कोयत्याने वार करून एका २३ वर्षीय युवकाची हत्या
बारामतीत पुन्हा एकदा कोयत्याने वार करून एका २३ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. तुळजाराम चतुचंद महाविद्यालय रस्त्यावर ही घटना घडली. मावस बहिणीशी बोलण्यावरून झालेल्या वादातून तिघांनी युवकावर हल्ला केल्याचे प्राथमिक वृत्त आहे. गेल्या सहा महिन्यांत बारामतीत घडलेला हा तिसरा खून असल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.