बीडच्या केजमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमध्ये आरोपी वाल्मिक कराड सीआयडीच्या अटकेत आहे. तो मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याबद्दलची महत्त्वाची माहिती सातत्यानं सोशल मीडियावर समोर आणत आहेत. मुंडेंविरोधात जोरदार लढा देणाऱ्या दमानिया यांना सगळी माहिती मिळते कुठून, त्यांना फोटो, व्हिडीओ रुपी दारुगोळा कोण पुरवतंय, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. त्या प्रश्नाला उत्तर देताना दमानियांनी त्यांचा सोर्स सांगितला. माहिती कशी शोधली, यावर त्या सविस्तर बोलल्या.
कराडनं वापरलेल्या कारचं नवं कनेक्शन समोर; आव्हाडांनी क्रोनोलॉजीच सांगितली; एक एक कडी जोडली
‘सरपंच संतोष देशमुख यांना अतिशय निर्घृणपणे मारण्यात आलं. त्यानंतरचा त्यांच्या कुटुंबाचा आक्रोश पाहिला. माझ्या वडिलांना न्याय मिळायला हवा, अशी मागणी देशमुखांच्या लेकीनं केली. तिची अवस्था पाहून मी लढायचं ठरवलं. आपल्याला जमेल तितकं करायचं, माहिती खणून काढायची असा निश्चय करुन शोधकाम सुरु केलं,’ असं दमानिया म्हणाल्या.
‘zaubacorp नावाची एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर जाऊन एखाद्या व्यक्तीचं नाव टाकल्यावर त्याची कुंडली मिळते. मी वाल्मिक कराडचं नाव टाकलं आणि डिरेक्टर शोधलं. तर तो दोन कंपन्यांमध्ये डायरेक्टर असल्याचं मला समजलं. जग्नमित्र शुगर्स, व्यंकटेश्वर इंडस्ट्रीयल सव्हिर्सेसमध्ये तो संचालक होता. मग त्याची माहिती काढली. मग अन्य डिरेक्टर्स कोण आहे ते पाहिलं. पहिलं नाव होतं राजश्री धनंजय मुंडे, त्यासोबत धनंजय पंडितराव मुंडे. त्यांनी राजीनामा कधी दिला तेदेखील पाहिलं. दोघांनी त्या कंपनीतील पदांचा राजीनामा दिलेला आहे. पण राजश्री मुंडे मात्र त्या कंपनीत आजतागायत डिरेक्टर असल्याचं समजलं,’ असा तपशील दमानियांनी सांगितला.
लग्नाच्या वाढदिवशी विवाहाच्या ड्रेसमध्येच आयुष्य संपवलं; VIDEO करुन आप्तांना शेवटची विनंती
‘धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांनी कंपनीतून एक्झिट घेतली असल्यानं ते एकत्र आहेत, भागीदार आहेत असं कसं म्हणायचं हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे मी जमिनीची माहिती काढली. जग्नमित्र शुगर फॅक्टरीची जागा पूस गावात आहे. जमिनीची ऑनलाईन माहिती सहज मिळते. त्यासाठी मी महाभूलेखच्या साईटवर जाऊन एरिया, जिल्हा, तालुका, गाव टाकला. कराडचं नाव इंग्लिशमध्ये टाकलं. त्यानंतर सगळे सातबारे मिळाले, २१, २२, ३४, ३५, ३६, ३७ असे क्रमांक होते. सगळ्या जमिनींची बेरीज केली तर ८८ एकर होती. याचा अर्थ यांच्या कंपन्या, जमिनी, दहशत, सगळ्याच गोष्टी एकत्र असल्याचं लक्षात आलं,’ असं दमानिया म्हणाल्या.