• Sun. Dec 29th, 2024
    “शुक्लाला मनसे सरळ करेलच, पण…” मराठी माणसाला शिवीगाळ करणाऱ्या परप्रांतियाला इशारा

    Kalyan Marathi Family beaten up : शुक्ला यांना अटक न केल्यास पोलिस उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही या रहिवाशांनी दिला.

    Kalyan Marathi Dispute : “शुक्लाला मनसे सरळ करेलच, पण…” मराठी माणसाला शिवीगाळ करणाऱ्या परप्रांतियाला इशारा

    कल्याण : घरात आणि घराबाहेर धूप लावून धूर केल्याने हटकल्याच्या रागातून वाद घालत मध्यस्थी करणाऱ्या शेजाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे प्रकरण कल्याणमध्ये चिघळले आहे. गुंडाच्या मदतीने मारहाण करणारे अखिलेश शुक्ला यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक करण्याची मागणी करत सोसायटीतील रहिवाशांनी सोसायटीच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी निषेध आंदोलन केले. शुक्ला यांना अटक न केल्यास पोलिस उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही या रहिवाशांनी दिला.

    दरम्यान, मनसेने या प्रकरणात उडी घेत, आरोपींवर कायदेशीर कारवाई करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला

    मनसेची काय भूमिका?

    ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे एका इमारतीत किरकोळ वादातून, मराठी माणसांना अर्वाच्य शिव्या देणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या शुक्ला नावाच्या माणसाविरोधात कायदेशीर कारवाई करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे.
    Mumbai Ferry Boat Accident : अपघातग्रस्त लाँचवर अख्खं कुटुंब चढणार होतं, पण मुंबईच्या वडापावने वाचवलं, अंजलीताई म्हणाल्या माझ्या मुलाने…
    महाराष्ट्रात मराठी माणसाला शिव्या देणाऱ्या शुक्लाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरळ करेलच पण मराठी माणसाने देखील आता जागं व्हायला हवं आणि यापुढे जसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसाच्या पाठी उभी राहते तसं मराठी जनतेने देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठी उभं रहायला हवं, असं आवाहनही मनसेने केलं आहे.

    काय आहे प्रकरण?

    कल्याण पश्चिमेकडील योगीधाम परिसरातील अजमेरा हाइट्स इमारतीत राहणारे अखिलेश शुक्ला मनमानी करत शेजाऱ्यांना त्रास देत असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. अखिलेश हे मंत्रालयात अधिकारी असून ते पदाचा गैरवापर करत असल्याचेही रहिवाशांचे म्हणणे आहे. बुधवारी त्यांनी शेजाऱ्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत होईपर्यंत मारहाण केली. त्यामुले त्यांच्यावर कारवाई करावी, अशी रहिवाशांची मागणी आहे.
    Mumbai Boat Accident : दिवसभर फोन बंद, बाबा आणायला आलेच नाहीत, पोलिसांनाही खबर नव्हती, पण सात तासात आयुष्य बदललं
    दरम्यान, मनसे जिल्हाप्रमुख उल्हास भोईर यांनी या प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. शुक्लांवर तातडीने कारवाई न केल्यास मनसे आपल्या पद्धतीने त्यांना धडा शिकवला जाईल, असा इशारा त्यांनी पोलिसांना दिला.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed