• Sat. Dec 28th, 2024
    हॅलो…; मेघना बोर्डीकर यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा फोन, मंत्रिमंडळात वर्णी लागणार?

    Meghna Bordikar will Take Oath as a Minister: भाजप आमदार मेघना बोर्डीकर दुसऱ्यांदा जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी कडवे आव्हान उभे केले होते.

    हायलाइट्स:

    • भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन
    • मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आमदार मेघना बोर्डीकर नागपूरकडे रवाना
    • नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मोठ्या घडामोडी घडतील
    महाराष्ट्र टाइम्स.कॉम
    भाजप आमदार मेघना बोर्डीकर

    धनाजी चव्हाण, परभणी : आज राज्यमंत्री मंडळाचा शपथविधी सोहळा संपन्न होणार असून त्यानिमित्ताने सर्वच पक्षातील इच्छुक आपली मंत्रिपदावर वर्णी लागावी यासाठी प्रयत्न करत होते परभणी जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार की नाही अशी चर्चा सुरू असतानाच काल रात्री भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांना फोन आला आणि त्यांना तातडीने नागपूरकडे रवाना होण्यास सांगितले आहे. आमदार मेघना बोर्डीकर यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचे आता निश्चित झाले असून त्या नागपूरकडे रवाना झाले आहे. भाजप आमदार मेघना बोर्डीकर दुसऱ्यांदा जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी कडवे आव्हान उभे केले होते. तरी देखील मेघना बोर्डीकर यांनी जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय मिळवला. त्यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपने त्या आमदार पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभा देखील झाल्या होत्या. अटीतटीच्या झालेल्या लढतीत मेघना बोर्डीकरांनी विजय मिळवला आणि आता त्याचे फळ म्हणून त्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे.
    Dharashiv News: काळ्या स्कॉर्पिओची रांग, ५०-६० गुंड अन् गावकऱ्यांना धमकी; बीडनंतर धाराशिवमध्ये पवनचक्कीवरुन दहशत

    तब्बल १४ वर्षानंतर परभणी जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार आहे. यापूर्वी महिला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी परभणी जिल्ह्यातून मंत्रीपद भूषवले होते. आता त्यांच्यानंतर महिला प्रतिनिधी म्हणून आमदार मेघना बोर्डीकर यांची वर्ण लागली आहे. मेघना बोर्डीकर यांना मंत्रिपद मिळाल्यास परभणी जिल्ह्यामध्ये विकासाचा राहिलेला अनुशेष भरून निघेल अशीच अपेक्षा परभणीकर व्यक्त करत आहेत. केवळ मंत्रिपद देऊन चालणार नाही तर परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील त्यांनाच देण्यात यावे अशी मागणी कार्यकर्त्यांमधून आणि सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed