• Sat. Dec 28th, 2024

    BJP New President : मंत्रिमंडळ विस्ताराआधी मोठी बातमी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलणार? ‘या’ नेत्याची लागणार वर्णी?

    BJP New President : मंत्रिमंडळ विस्ताराआधी मोठी बातमी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलणार? ‘या’ नेत्याची लागणार वर्णी?

    महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून २१ मंत्री शपथ घेणार आहेत, त्यात ९ नवे चेहरे असतील. चंद्रशेखर बावनकुळे मंत्रीपदी निवड झाल्याने भाजप प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहऱ्याची निवड होण्याची शक्यता आहे. कोण आहे तो नेता जाणून घ्या.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्यासाठी काही तास बाकी असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. सरकारमधील मंत्रिमंडळात भाजपचे २१ मंत्री आज शपथ घेणार असून मंत्रिमंडळामध्ये ९ नवे चेहरे असणार आहेत. यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव मंत्रिपदाच्या यादीत आहे. त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहरा दिसणार असल्याची दाट शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदी असे नाव समोर आले आहे, ज्यांचं मंत्रिमंडळामध्ये नाव निश्चित मानलं जात होतं. परंतु भाजप या नेत्याकडे प्रदेशाध्यपद देणार असल्याचं समजत आहे. कोण आहे तो नेता जाणून घ्या.

    भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांचे नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. भाजपकडे नेहमी एक व्यक्ती एक पद अशी जबाबदारी देण्यात येत असते. रविंद्र चव्हाण यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक जागा मिळवून दिल्या होत्या. त्यामुळे भाजपकडून रविंद्र चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. ज्यावेळी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरत नव्हता तेव्हा रविंद्र चव्हाण यांचे नाव समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं.

    २००९ साली कल्याण विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. तेव्हापासून येथे भाजप आणि रविंद्र चव्हाण यांचे वर्चस्व आहे. २००९च्या विधानसभा निवडणुकीत नव्याने तयार झालेल्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून त्यांना भाजपने संधी दिली. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठा विजय मिळवला. त्यानंतर २०१४च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा बाजी मारली. २०१६ साली त्यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान मिळाले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजयाची हॅट्रिक पूर्ण केली. २०२२ मध्ये शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले होते.

    भाजपच्या ‘या’ आमदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी?

    नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले , चंद्रकांत पाटील , पंकज भोयर, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, जयकुमार गोरे, अतुल सावे, माधुरी मिसाळ, आकाश फुंडकर, संजय उईके, संजय सावकारे, आशिष शेलार

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *