• Thu. Dec 26th, 2024
    मनसेचा माजी आमदार ‘सागर’ बंगल्यावर, देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार, कारण इंटरेस्टिंग

    MNS leader meets Devendra Fadanvis : माजी आमदार राजू पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ‘सागर’ बंगल्यावर दाखल झाले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील ‘सागर’ बंगल्यावर गेल्याचे वृत्त समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी राजू पाटील त्यांच्या निवासस्थानी गेल्याची माहिती आहे. मनसे नेता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आल्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या. मात्र ही भेट वैयक्तिक कारणास्तव असल्याचे समोर आले आहे.

    राजू पाटील ‘सागर’ बंगल्यावर

    राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजू पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ‘सागर’ बंगल्यावर दाखल झाले. राजू पाटील आपल्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण करण्यासाठी गेल्याची माहिती आहे.

    भाजप-मनसे नेते व्याही-व्याही

    राजू पाटील यांचे पुत्र आदित्य पाटील आणि भिवंडीचे भाजपचे माजी आमदार योगेश पाटील यांची कन्या सिद्धी पाटील यांचा साखरपुडा जानेवारी महिन्यात झाला होता. त्यामुळे भाजप आणि मनसेचे माजी आमदार एकमेकांचे व्याही झाले आहेत. साखरपुड्याला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली होती.

    मनसेने भोपळाही फोडला नाही

    राजू पाटील हे गेल्या विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडून आलेले एकमेव मनसे आमदार होते. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला. अमित ठाकरेंसह मनसेच्या सर्वच शिलेदारांचा पराभव झाला. हा राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का होता. त्यानंतरही मनसेच्या नेत्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे महायुतीत सहभागी होण्याचा आग्रह धरला आहे.
    Cabinet Expansion : बावनकुळेंना महसूल खातं, भाजप प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री; शिवसेनेतही तिघे मंत्रिपदाला मुकणार

    लोकसभेला बिनशर्त पाठिंबा, विधानसभेला स्वबळावर

    खरं तर लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बाहेरुन बिनशर्थ पाठिंबा दिला होता. राज ठाकरेंनी शिवसेना-भाजपच्या काही उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. तिथले उमेदवार विजयीही झाले. त्यानंतर मनसे महायुतीत सहभागी होण्याच्या चर्चांना जोर मिळाला. अगदी मनसेच्या साथीने भाजपचा मुख्यमंत्री होईल, असं वक्तव्यही राज ठाकरेंनी केलं. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीत मनसेने स्वबळाचा नारा देत शंभरहून अधिक उमेदवार उतरवले.

    Raju Patil : मनसेचा माजी आमदार ‘सागर’ बंगल्यावर, देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार, कारण इंटरेस्टिंग

    Devendra Fadnavis : हॅलो, अभिनंदन! उद्या मंत्रिपदाची शपथ घ्यायचीये, खुद्द फडणवीस फोन फिरवणार, स्पेशल २२ कोण?

    राज ठाकरे-फडणवीस यांचे मैत्र

    मनसेचे काही आमदार निवडून आले असते, तर भाजपने केवळ मनसेच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले असते, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चित्र बदललं. मात्र राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत सहकार्याची भावना बोलून दाखवली आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed