Santosh Deshmukh Murder Case : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्हा बंदची हाक देण्यात आली. खासदार बजरंग सोनवणे यांनी केज पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी केली.
बीडचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आता काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगा गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात त्यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर आता बीडमध्ये आल्यावर सोनवणे यांनी संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला पकडण्यामध्ये दिरंगाई होत असल्याने एक तास केत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला.
पोलीस ठाण्यामध्ये मुर्दाबाद मुर्दाबाद पोलीस मुर्दाबाद पोलीस निरीक्षक महाजन मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. पोलीस स्टेशन केज येथे ठिय्या पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये बसून बजरंग सोनवणे यांनी पोलीस निरीक्षक आणि डीवायएसपीना घेरलं होतं. मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात तात्काळ कारवाई करून मुख्य सूत्रधाराला शोधा आणि कसून चौकशी करा कारवाई दिरंग केली तर सोडणार नाही, असा दमही बजरंग सोनवणे यांनी पोलिसांना भरला.
Kurla Bus Accident: प्रशिक्षणावेळी दिंडोशी बस डेपोत काय घडलं? मोरेचा जबाब; कुर्ला प्रकरणात चिंताजनक माहिती उघड
नेमकं काय घडलं होतं?
९ डिसेंबरला भरदिवसा संतोष देशमुख यांच हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे आणि जयराम माणिक, महेश केदार, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे यांचा आरोपी म्हणून समावेश आहे. या आरोपींमधील जयराम, महेश आणि प्रतीक ताब्यात असून इतर फरार आहेत.