साईभक्तांना आता साईमंदिरात दर्शनाला जाताना भक्तांना हार फुलं घेऊन जाता येणार आहेत.कोरोनाकाळात घातलेली बंदी हायकोर्टाने उठवली आहे. हार फुल प्रसाद घेऊन जाता येणार असल्याने साई भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.ना नफा, ना तोटा तत्त्वावर साई संस्थान एम्पलोइज सोसायटीकडून हार फुल प्रसादाची विक्री होणार आहे.साई मंदिराच्या दर्शन रांगेच्या प्रवेशद्वारासमोर सोसायटीकडून स्टॉल लावण्यात आले आहेत.