मारकडवाडी प्रकरणावरून राज्यात ईव्हीएम विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघातही ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. अपक्ष उमेदवार रॉकी बंगाळे यांनी आपल्या पराभवावरून प्रश्न उपस्थित केले आहेत. संपूर्ण तालुक्यात काहीतरी संशयास्पद घडले आहे असं बंगाळेंनी म्हटलं. मनोज जरांगेंचा आशीर्वाद असतानाही केवळ ८०० मतं मिळाल्याने त्यांनी संशय व्यक्त केला.