Kurla Best Bus Accident : फातिमा या कुर्ला येथील एका खासगी रुग्णालयामध्ये रात्रपाळीसाठी जात होत्या. त्यावेळी बेस्ट बसने जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
हायलाइट्स:
- मृत फातिमा यांच्या मुलाचा आक्रोश
- रुग्णालयात जाताना काळाचा घाला
Good News! ‘यात्री’ अॅपवर आता काढता येणार मेट्रोचेही तिकीट; प्रवाशांना मिळणार ‘या’ खास सुविधा
सोमवारी त्यांची ड्युटी आठ वाजता होती. पण कामाला जाण्याआधी त्या थोडावेळ मुलाबाळांसोबत थांबल्या, ‘बरेच दिवस आपण बोललो, भेटलो नाही,’ असे पुन्हा पुन्हा सांगत होत्या. ‘नऊ वाजता ती घरातून निघाली आणि वीस मिनिटांतच तिच्या मोबाइलवरून कुणीतरी फोन केला होता. आम्ही धाव घेतली. गर्दी, आरडाओरडा यांमुळे कुणाला काहीच कळत नव्हते. कार आणि बसच्या मध्ये आई अक्षरशः दाबली गेली होती. बसने उडवले, त्याचवेळी जागीच तिचे प्राण गेले,’ हे सांगताना आबिद याच्या आवाजात कंप होता.
Kurla Accident: बायकोला शेवटचा कॉल, रुग्णालयाच्या दारातच सोडले प्राण, कुर्ला अपघातात गायकवाडांचा चटका लावणारा अंत
दागिने गायब
पोलिसांनी फातिमा यांचा मृतदेह भाभा रुग्णालयामध्ये नेला. ‘तिला मी शेवटचे पाहिले, तेव्हा तिच्या हातात, गळ्यात, कानात नेहमीचे दागिने होते. पण नंतर पाहिले, तेव्हा ते गायब झाले होते. पोलिसांना आम्ही माहिती दिली. सीसीटीव्ही तपासून आता काय होणार? माणुसकी संपली आहे का ? गेलेल्या माणसांनाही चोर सोडत नाहीत का? माझ्या आईने कष्टाने एक एक रुपया जमवून दागिने घेतले होते. कोणाचा एक रुपयाही तिने कधी घेतला नव्हता…’ हे सांगताना त्याच्या अश्रूचा बांध फुटला.