• Sat. Dec 28th, 2024

    महायुतीचे आमदार हसले अन् विरोधक रुसले, फडणवीस-दादा-शिंदेंची एन्ट्री आज चर्चेत!

    महायुतीचे आमदार हसले अन् विरोधक रुसले, फडणवीस-दादा-शिंदेंची एन्ट्री आज चर्चेत!

    Produced byविश्रांती शिंदे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Dec 2024, 8:50 pm

    विधानसभा निवडणूक २०२४ च्या निकालात महायुतीला मोठं यश मिळालं. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतली. तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आजपासून महाराष्ट्र विधानसभेचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा आज पडला. पण त्याआधी फडणवीस-दादा-शिंदे यांची विधानभवनातील एन्ट्री चर्चेचा विषय ठरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या आमदारांसह हसत हसत विधानभवनात आले. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी गुलाबी फेटे घालून विधानभवन परिसरात प्रवेश केला. गुलाबी फेटे घातलेल्या आमदारांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसत होतं. तर दुसरीकडं शिवसेनेच्या आमदारांमध्येही मोठा उत्साह होता. शिवसेनेच्या आमदारांनी फगवे फेटे घालून विधानभवन परिसरात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदार विधानभवन परिसरात दाखल झाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एन्ट्रीवेळी मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनीही फडणवीसा नमस्कार करत चालता चालता त्यांची भेट घेतली… एकीकडे महायुतीचे नेते हसत-हसत विधानभवनात आले मात्र तर तिकडे विरोधकांचा रुसवा मात्र कायम राहिला. नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी यावेळी शपथ घेतली. परंतु ईव्हीएमचा निषेध नोंदवत विरोधी पक्षातील नेत्यांनी आमदारकीची शपथ आज न घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट झाली तोही विषय चर्चेचा ठरला. यावेळी दोघांनी हस्तांदोलन करत बातचित केली. निघताना पुन्हा एकदा दोघांनी शेकहँड करत निरोप घेतला. आज पहिला दिवस संपला आता उद्या आणखी काय घडलं हे पाहावं लागेल….

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed