Goregaon Mulund Link Road Twin Tunnel : गोरेगाव – मुलुंड लिंक रोडचं काम सुरू असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली ट्विन टनलचं काम सुरू आहे. या टनलच्या कामासाठी आता टेक्निकल ऑडिट केलं जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलैमध्ये जीएमएलआरच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत दुहेरी बोगद्याच्या कामाचा शुभारंभ केला होता. आता या ट्विन टनलच्या कामाला अधिक वेग देण्यासाठी बीएमसीने थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑडिटच्या कामासाठी व्हीजेटीआयची नियुक्ती करण्यात आल्याचं बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.
कुर्ला – बीकेसी मार्गावर पॉड टॅक्सी कधी सुरू होणार? जाणून घ्या कसा असेल मार्ग आणि किती असेल भाडं?
दीड तासांचं अंतर १५ ते २० मिनिटांत पूर्ण
जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडवरुन मुलुंड, ठाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक ते दीड तासांचा वेळ लागतो. मात्र गोरेगाव – मुलुंड लिंक रोडचं काम पूर्ण झाल्यानंतर हा वेळ केवळ १५ ते २० मिनिटांत पूर्ण करता येईल.
नवी मुंबईहून अटल सेतूमार्गे ऑरेंज गेट-मरिन ड्राईव्ह बोगदा; ९ किमी लांबीचा कसा असेल मार्ग? टोलसाठी भरावे लागणार अधिक पैसे
ट्विन टनल उभारण्यासाठी होतेय मोठी समस्या
गोरेगाव – मुलुंड लिंक रोडसाठी उभारण्यात येणाऱ्या ट्विन टनलबाबत बोलताना अधिकाऱ्याने सांगितलं की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली दुहेरी बोगद्याचं बांधकाम करणं अत्यंत आव्हानात्मक आहे. त्यामुळेच व्हीजेटीआयकडून तांत्रिक मदतीसोबतच कामाचा दर्जा आणि प्रकाश मॅनेजमेंटच्या अंमलबजावणीसाठी मदत घेतली जात आहे.
नरिमन पॉईंट ते विरार दीड तासांचा प्रवास ३५ मिनिटांत होणार, कसा असेल मार्ग? कधी सुरू होणार?
पुढे ते म्हणाले की, कोस्टल रोडच्या बांधकामात सुरुवातीच्या काळात अडचणी आल्या होत्या, ते पाहता ट्विन टनलच्या बांधकामात थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खर्चात मोठी वाढ
टनलच्या खोदकामासाठी टनल बोरिंग मशीन चीनवरुन मुंबईत आणली जाणार आहे. मार्च २०२५ आधी मशीन येईल आणि त्यानंतर टनलचं काम सुरू होईल.
ट्विन टनल उभारताना गुणवत्तेच्या दृष्टीने थर्ड पार्टी ऑडिट केलं जाणार आहे, मात्र यामुळे खर्चात मोठी वाढ होणार आहे. सध्या ट्विन टनलसाठी ६३०० कोटींचा खर्च आहे, मात्र थर्ड पार्टी ऑडिट केल्यानंतर हा खर्च वाढून ६५०० कोटींहून अधिक होऊ शकतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली हा ट्विन टनल उभारण्याशिवाय, फिल्म सिटीजवळही १.६ किमी लांबीचा टनल उभारण्यात येणार आहे.