हा शपथ घेतानाचा व्हिडिओ आहे अशोक चव्हाण यांची लेक श्रीजया चव्हाण यांचा… नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या चार दशके वर्चस्व राहिलेल्या चव्हाण कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील श्रीजया चव्हाण यांनी आज आमदार पदाची शपथ घेतली. त्या भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडुण आल्या. त्यांच्या आधी दिवंगत नेते डॉ शंकरराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अमिता चव्हाण यांनी भोकर मतदारसंघाचे आमदार म्हणून शपथ घेतली होती. भोकर विधानसभा निवडणुकीत यंदा प्रथमच भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलेले आहे. या मतदारसंघातुन महायुतीच्या उमेदवार श्रीजया अशोक चव्हाण पन्नास हजारांच्या मताधिक्याने निवडून आल्या. काँग्रेसच्या तिरुपती कदम कोंढेकर यांचा पराभव करत श्रीजया चव्हाण यांनी विजय मिळवला.