मतमोजणी होऊन दहा ते बारा दिवसांनी महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतोय हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असं राऊत म्हणाले.बहुमत मिळून तेरा दिवस उलटून गेले तरी महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळू शकला नाही याच्या मागचं कारण राऊतांनी विचारलं.एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला आता काडीची देखील किंमत नाही असंही राऊत म्हणाले.शिंदेंना गरज असेल तर या नाहीतर चालते व्हा अशी सांगायची ताकद भाजपने ठेवली आहे असंही राऊत म्हणाले. -अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी शिंदे गटाची विकेट कधीच पाडली आहे असा टोला राऊतांनी लगावला.