Devendra Fadnavis Modelling Photoshoot Inside Story : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी एकेकाळी मॉडेलिंग केलं होतं. त्यांच्या या फोटोशूटचे होर्डिंग्स संपूर्ण शहरात लागले होते.
शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्यानंतर फडणवीसांनीचे मोठे वक्तव्य; लोकांच्या मनातील किंतू परंतू…
फडणवीसांनी केलेलं खास फोटोशूट
देवेंद्र फडणवीसांच्या मॉडेलिंगची चर्चा नागपूर, मुंबई ते थेट दिल्लीपर्यंत झाली होती. त्यावेळी फडणवीस दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडणून आले होते. फडणवीसांच्या फोटोशूटची बातमी ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांना कळली, त्यावेळी त्यांनी फडवणवीसांना दिल्लीत बोलावून घेतलं होतं.
राज्यात उद्रेक होईल; माजी आमदाराने दिला इशारा, मतदारसंघात मारकडवाडी पॅटर्न राबवण्याची घोषणा
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना फडणवीसांचे मित्र शैलेष जोगळेकर यांनी सांगितलं, की दिल्लीत अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना मॉडेलजी या…असं म्हणत त्यांचं स्वागत केलं होतं. अटल बिहारी वाजपेयी फडणवीसांवर खूश होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फडणवीसांचे मॉडेलिंगचे फोटो त्यांचे मित्र, फोटोग्राफर विवेक रानडे यांनी काढले होते. फडणवीसांच्या या मॉडेलिंग फोटोचे होर्डिंग्स नागपुरात जागोजागी झळकले होते.
6th December 2024 Holiday : ६ डिसेंबरला मुंबईत सरकारी ऑफिस, शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्रात मोठा चाहतावर्ग
नागपुरात जन्मलेले देवेंद्र फडणवीस राज्यातील भाजपचे सर्वात मोठे नेते आहेत. एबीवीपीतून राजकारणात आलेले देवेंद्र फडणवीस आमदार बनण्याआधी नागपुरात नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते वयाच्या २२व्या वर्षी नगरसेवक बनले होते. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर वयाच्या २७व्या वर्षी ते महापौर बनले. त्यानंतर १९९९ मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते.
२०१३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर फडणवीस यांना पुढे जाण्याची संधी मिळाली. २०१४ मध्ये फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यात चांगली कामगिरी केली. यानंतर त्यांनी २०१४ च्या निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवलं. २०१४ मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री होते. आता फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
देवेंद्र फडणवीसांनी केलेलं मॉडेलिंग शूट, थेट दिल्लीतून बोलावणं आलेलं… काय आहे या फोटोमागची स्टोरी
फडणवीसांचं उच्च शिक्षण
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठाच्या महाविद्यालयातून कायद्याची डिग्री घेतली आहे. तसंच त्यांनी बिजनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहेत. इतकंच नाही, तर त्यांनी DSE-जर्मन फाउंडेशन फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, बर्लिन, जर्मनी येथून प्रोजेक्ट मॅनेजमेंट मेथड्स अँड टेक्निक्समध्ये डिप्लोमा केला आहे.