Chhagan Bhujbal: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवार चाकणमधील कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले.
चाकणमधील कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी चारची होती. राष्ट्रवादी काँग्रस शपचे अध्यक्ष शरद पवार चार वाजताच कार्यक्रमाला पोहोचले. पण माजी मंत्री छगन भुजबळांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास उशीर झाला. ते साडे पाच वाजता व्यासपीठावर आले. त्यांचं आसन शरद पवारांच्या शेजारीच होतं. त्यामुळे भुजबळ पवारांच्या बाजूला बसले. जवळपास २० मिनिटं उलटली. पण दोघांमध्ये काहीच संवाद झाला नाही.
शरद पवारांचा पक्ष सोबत येत असेल तर..; दादांच्या निष्ठावंतांची एकच अट; स्पष्ट भूमिका, विषय कट
२० मिनिटं उलटल्यानंतर शरद पवारांनी कार्यक्रम पत्रिका हातात घेतली. सोफ्याचा आधार घेत पवारांनी त्या पत्रिकेवर पेननं काहीतरी मजकूर लिहिला. काही सेकंद पवार पत्रिकेवर लिहित होते. यावेळी शेजारी बसलेले भुजबळ कार्यक्रम पत्रिका वाचत होते. पवारांचं लिहून झाल्यानंतर त्यांनी भुजबळांच्या हातात असलेली कार्यक्रम पत्रिका आपल्या हातात घेतली आणि त्यांच्या हातात असलेली, मजकूर लिहिलेली कार्यक्रम पत्रिका भुजबळांकडे दिली. त्यानंतर भुजबळ त्यावरील मजकूर लक्षपूर्वक वाचू लागले.
कार्यक्रमस्थळी उशिरा आलेल्या भुजबळांशी शरद पवार सुरुवातीची २० मिनिटं काहीच बोलले नाहीत. त्यानंतर त्यांनी थेट कार्यक्रम पत्रिकेवर संदेश लिहून भुजबळांना दिला. त्यामुळे पवारांनी कार्यक्रम पत्रिकेवर नेमकं काय लिहिलं याची चर्चा रंगू लागली. पवार कार्यक्रमाला संध्याकाळी ४ वाजताच आलेले होते. त्यामुळे त्यांनी भुजबळांना कार्यक्रम आटोपता घेण्याची सूचना केली का, असा कयास काहींनी बांधला.
एका पोलिसानं साडी नेसून करुणा मुंडेंच्या कारमध्ये पिस्तुल ठेवलं; धसांचा पुन्हा खळबळजनक दावा
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज आहेत. पवारांनी या पार्श्वभूमीवर भुजबळांना काही संदेश दिला का, अशीही चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेले भुजबळ १५ दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले. त्यानंतर ते परदेशी निघून गेले. काही दिवसांपूर्वीच ते मायदेशी आले. आज सकाळी ते साताऱ्यातील नायगावात मुख्यमंत्र्यांसोबत एका कार्यक्रमात होते. माझा निर्णय झालेला आहे. तो योग्यवेळी जाहीर करेन, असं भुजबळांनी आजच माध्यम प्रतिनिधींना सांगितलं.