• Mon. Jan 6th, 2025

    Navi Mumbai Accident: आधी कारने धडक, मग मदतीच्या बहाण्याने शहरभर फिरवलं अन् जखमी चिमुकल्याला पुन्हा रस्त्यावर सोडलं

    Navi Mumbai Accident: आधी कारने धडक, मग मदतीच्या बहाण्याने शहरभर फिरवलं अन् जखमी चिमुकल्याला पुन्हा रस्त्यावर सोडलं

    Navi Mumbai Child Injured In Accident: एका महिलेने रस्त्यावर एका चिमुकल्याला धडक दिली. त्यानंतर जेव्हा लोकांनी तिला सांगितलं की मुलाला रुग्णालयात घेऊन जा तेव्हा तिने मुलाला गाडीत बसवलं आणि संपूर्ण शहर फिरवलं त्यानंतर तिने त्याला पुन्हा तिथेच आणून सोडलं.

    Lipi

    रायगड: नवी मुंबईमध्ये एक विचित्र घटना घडली असून कार चालक महिलेच्या अजब कारनाम्यांनी अनेक जण अचंबित झाले आहेत. नवी मुंबईतील ज्वेल्स ऑफ नवी मुंबईच्या रस्त्यावर मोहम्मद समीम अन्सारी नामक सहा वर्षांचा मुलगा एल आणि टी चौकाजवळ रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेली सेल्टोस कारने जबरदस्त धडक दिली. या धडकेत मोहम्मद समीम अन्सारी याचा पाय फ्रॅक्चर होवून पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवू लागला. मात्र, त्याला उपचार करण्यासाठी कारमध्ये बसवून कार चालक महिलेने त्याला कारमध्ये नवी मुंबईत फिरवून काही तासांनी परत अपघात स्थळी आणून टाकून दिले. या विक्षिप्त कार चालक महिलेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र, या महिलेची अद्याप ओळख पटली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

    ज्वेल्स ऑफ नवी मुंबईच्या रस्त्यावर दिनांक ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास मोहम्मद समीम अन्सारी हा सहा वर्षांचा मुलगा एल आणि टी चौकाजवळ रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या लाल रंगाच्या किया सेल्टोस कारने चिमुरड्याला जबरदस्त धडक दिली. यावेळी कार महिला चालक चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या दुर्घटनेत ६ वर्षीय मुलगा भीषण जखमी झाला आहे.

    या दुर्घटनेनंतर महिलेने कार थांबवली आणि ती मुलाला पाहण्यासाठी कारबाहेर आली. तेथे जमा झालेल्या गर्दीने ‘मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा’ असे कार चालक महिलेला सुचवले. त्याचदरम्यान त्या मुलाची काकी देखील तिथे आली. मुलाच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने मोठ्या प्रमाणात पायातून रक्तस्त्राव होत होता. अखेर कार चालक महिला मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यास तयार झाली.

    मुलाच्या काकीला तिने मागून हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितले आणि रक्तबंबाळ मुलाला घेऊन ती आपल्या कारने निघाली. तिने गंभीर जखमी मुलाला आपल्या कारमधून तर नेले मात्र कोणत्याही हॉस्पिटलमध्ये न जाता तिने पुन्हा त्या मुलाला अपघातस्थळी आणले आणि रस्त्यावरच टाकून महिलेने घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेनंतर या विक्षिप्त कार चालक महिलेविरुद्ध नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र, या महिलेची अद्याप ओळख पटली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed