• Sun. Jan 5th, 2025
    मुंडे अडचणीत, राजीनाम्याची मागणी, तरीही अजित पवार गप्प का? धनुभाऊंना कोणाचं बळ?

    Dhananjay Munde: बीडच्या केजमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमध्ये वाल्मिक कराडला अटक झालेली आहे. कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे. खुद्द मुंडे यांनीदेखील तशी कबुली दिलेली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: बीडच्या केजमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमध्ये वाल्मिक कराडला अटक झालेली आहे. कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे. खुद्द मुंडे यांनीदेखील तशी कबुली दिलेली आहे. भाजप आमदार सुरेश धस सातत्यानं आका असा उल्लेख मुंडे यांना लक्ष करत आहेत. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मौन चर्चेचा विषय आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार शांत का? असा प्रश्न राजकीय वर्तुळातील सगळ्यांनाच पडला आहे.

    सरपंच देशमुख हत्या प्रकरणात कराड तुरुंगात गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांची सीआयडीकडून चौकशी झालेली आहे. धनंजय मुंडे प्रचंड अडचणीत आलेले असताना अजित पवारांचं मौन सूचक मानलं जात आहे. धनंजय मुंडेंना धडा मिळत असतील तर तसं होऊ द्यावं, असा पवित्रा अजित पवारांनी घेतला आहे का, याची चर्चा पक्षातच दबक्या आवाजात सुरु आहे.
    एका पोलिसानं साडी नेसून करुणा मुंडेंच्या कारमध्ये पिस्तुल ठेवलं; धसांचा पुन्हा खळबळजनक दावा
    राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना धनंजय मुंडे मंत्री होते. त्यावेळी त्यांच्यावर करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. बीडमध्ये जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला. मंत्री असलेल्या मुंडेंवर झालेले आरोप गंभीर असल्यानं त्याची दखल शरद पवारांनी घेतली. मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंची भूमिका होती. त्या अवघड परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंडेंची ठामपणे पाठराखण केली होती.

    शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेत मुंडेंच्या पाठिशी ठामरणे उभे राहणारे अजित पवार आता पक्षाचे अध्यक्ष असताना गप्प आहेत. मुंडेंची प्रचंड कोंडी झालेली असताना त्यांनी भूमिका घेतलेली नाही. उलट भाजपचे आमदार या प्रकरणात घेत असलेल्या भूमिकेपेक्षा अधिक कठोर भूमिका अजित पवारांच्या पक्षाचे बीडमधील आमदार घेत आहेत. प्रकरणाचा तपास होईपर्यंत मुंडेंना बिनखात्याचं मंत्री करा, अशी भूमिका बीडमधील राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतलेली आहे.
    Walmik Karad: स्लीप ऍप्नियाचा त्रास असल्याचा कराडचा दावा, २४ तास मदतनीस देण्याची मागणी; हा आजार नेमका काय?
    धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनही गोची केली जात आहे. पक्षाच्या नेतृत्त्वाची मूकसंमती असल्याशिवाय अशा गोष्टी सहजा घडू शकत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं घडतंय काय आणि अजित पवारांच्या मौनाचा नेमका अर्थ काय, असे प्रश्न सगळ्यांना पडले आहेत. पक्षातील एखादा नेता डोईजड होतो, तेव्हा त्याला अशाप्रकारे अडचणीत आणलं जातं. आता तेच मुंडेंसोबत घडतंय हा प्रश्न आहे.

    दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंना अभय दिलं आहे. या प्रकरणी राजकारण होत असल्याचं म्हणत फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे संकेत दिले. कॅबिनेटची पहिली बैठक झाल्यानंतर मुंडेंचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला दिसला. मी राजीनामा का द्यावा आणि मी बीडचा पालकमंत्री काय होऊ नये, असे प्रश्न त्यांनी विचारले. त्यानंतर मुंडेंना नेमका कोणाचा आशीर्वाद मिळालाय, याची चर्चा सुरु झाली.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed