Rahul Jagtap meets Ajit Pawar : नुकतीच राहुल जगताप यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे
कोण आहेत राहुल जगताप?
राहुल जगताप हे अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. जगताप हे माजी आमदार असून राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षात होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघातून शरद पवारांकडे तिकीट मागितलं होतं. मात्र जागावाटपात हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाटेला गेला. त्यामुळे राहुल जगताप यांनी बंडखोरी करत अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली. परंतु त्यांना पराभवाचा धक्का बसला. त्याचवेळी पवार गटाने त्यांचे पक्षातून निलंबनही केले.
Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, हे बघा, चर्चा सुरु आहेत पण…
अपक्ष लढूनही दुसऱ्या क्रमांकावर
महायुतीचे उमेदवार असलेले भाजप नेते विक्रमसिंह पाचपुते यांच्याकडून जगतापांना पराभव स्वीकारावा लागला. पाचपुते यांना ९८ हजार ९३१ मतं मिळाली, तर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अनुराधा नागवडे यांना ५३ हजार ९६ मतं मिळाली. मात्र राहुल जगताप यांना अपक्ष लढूनही दुसऱ्या क्रमांकाची ६२ हजार ३७ मतं मिळाल्याची माहिती आहे. म्हणजेच महाविकास आघाडीकडून लढले असते, तर कदाचित जगताप विजयी ठरु शकले असते.
Rahul Jagtap : सरकार येण्याआधीच झटका, शरद पवार गटाचा माजी आमदार अजित दादांना भेटला, पक्षप्रवेशही ठरला?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर पक्षप्रवेशाची शक्यता
दरम्यान, नुकतीच राहुल जगताप यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर राहुल जगताप हाती ‘घड्याळ’ बांधण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीने यासंदर्भात बातमी दिली आहे.
Home Ministry : एकनाथ शिंदेंचं ‘गृह’प्रेम, होम मिनिस्टर होण्यासाठी तिसऱ्यांदा प्रयत्न, खातं इतकं महत्त्वाचं का?
ईव्हीएमवर आक्षेप
खरं तर, अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ पैकी दहा मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत ईव्हीएमच्या पडताळणीची मागणी केली आहे. यामध्ये राहुल जगताप यांचाही समावेश आहे. आता सत्तेत गेल्यानंतर जगताप काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.