Simhastha Kumbh Mela Nashik: १२ वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याचे किमान दोन ते तीन वर्ष आधी नियोजन सुरू करावे लागते. सन २०१५ नंतर आता सन २०२६-२०२७ मध्ये सिंहस्थ होणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू करण्यात आले असले तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे हा विषय काहीसा मागे पडला होता.
नाशिकचा सिंहस्थ पावसाळ्यात होत असल्याने त्याचे नियोजन करणे आव्हानात्मक काम असते. साधू-महंतांसह लाखोंच्या संख्येने शाही स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची व्यवस्था करताना प्रशासनाचा कस लागतो. त्युामुळे १२ वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याचे किमान दोन ते तीन वर्ष आधी नियोजन सुरू करावे लागते. सन २०१५ नंतर आता सन २०२६-२०२७ मध्ये सिंहस्थ होणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू करण्यात आले असले तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे हा विषय काहीसा मागे पडला होता.
गृहखात्यासाठी मोर्चेबांधणी; शिवसेनेची अपेक्षा, सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग येणार
आता निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सिंहस्थाची दर मंगळवारी आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. एक दोन बैठका झाल्या असून, स्वतंत्र सिंहस्थ कक्ष सुरू होणे आवश्यक आहे. आगामी सिंहस्थात ५० लाख साधू-महंत आणि पाच कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. सर्व विभागांची कामे वेळेत मार्गी लावण्यासाठी व जिल्हास्तरावर यंत्रणांच्या समन्वयासाठी स्वतंत्र कक्ष तातडीने स्थापन करणे आवश्यक आहे.
Aditya Thackeray: हा तर ‘लाडक्या’ आयोगाचा अपमान; सत्तास्थापनेचा दावा न केल्याने आदित्य ठाकरेंचा टोला
सिंहस्थाचे नियोजन अनेक यंत्रणांना सोबत घेऊन करावे लागते. त्यामुळे त्यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र कक्षाची आवश्यकता आहे. परंतु, या कक्ष स्थापनेला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. या कक्षात ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणार आहे. अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यासह दोन उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, लिपिक व अन्य कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यासंदर्भातही जिल्हा प्रशासनाने चार महिन्यांपूर्वी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. परंतु, तो अद्याप धूळ खात पडला आहे.