• Thu. Dec 26th, 2024
    विधानसभा निवडणुकीदरम्यान EVM हॅक झाल्याचा दावा, व्हायरल व्हिडिओनंतर मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई

    EVM Hack Mumbai Cyber Police : विधानसभा निवडणुकीत सैयद शुजा नावाच्या व्यक्तीने EVM हॅक झाल्याचा दावा केला आहे. मुंबई सायबर पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. शुजा याने केलेले दावे खोटे असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतील मोठं यश मिळालं आहे. विधानसभेच्या निकालानंतर महायुतीवर विरोधकांकडून ईव्हीएम हॅकप्रकरणी अनेक आरोप केले जात आहेत. अशात या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक झाल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    काय आहे नेमकं प्रकरण?

    निवडणूक आयोगाने सैयद शुजा या व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केली आहे. सैयद शुजा याने दावा केला होता, की ईव्हीएम हॅक होऊ शकतं. EVM ची फ्रिक्वेन्सी वेगळी करुन ते हॅक करता येऊ शकतं असं शुजाने म्हटलं होतं. त्याच्या विरोधात मुंबई पोलिसांकडून ३० नोव्हेंबर रोजी भारतीय न्याय संहिता आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    माझी तब्येत बरी आहे, मी गावाला यायचं नाही का? CM पदाबाबत शिंदे म्हणाले- मुख्यमंत्री व्हावं अशी…

    व्हायरल व्हिडिओनंतर कारवाई होणार

    महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सैयद शुजाविरोधात तक्रार दाखल केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी शुजाचे ईव्हीएम हॅक होत असल्याचे दावे फेटाळून लावले असून ते खोटे आणि आधारहिन असल्याचं म्हटलं आहे.

    सैयद शुजा याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्याने महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा दावा केला होता. त्याशिवाय २०१९ मध्येही असंच एक प्रकरण समोर आलं होतं. त्यावेळीही सैयद शुजाविरोधात दिल्लीत एफआयआर नोंदवण्यात आला होता.
    Nanded News : ऑईल मीलमध्ये अचानक स्फोट, आगीचा भडका उडाला; भीषण आगीत कामगार होरपळले

    सैयद शुजा परदेशात फरार

    महाराष्ट्र CEO ऑफिसने एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय, की अशाच प्रकारच्या एका घटनेत निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर २०१९ मध्ये दिल्लीत शुजा नावाच्या व्यक्तीविरोधात FIR दाखल करण्यात आली होती. सध्या तो परदेशात फरार आहे. दिल्ली आणि मुंबई पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. शुजाच्या संपर्कात असलेल्या लोकांचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे.

    शिंदेंच्या शिलेदाराचा विधानसभेत निसटता पराभव, जरांगेना भिडणारा माजी आमदार म्हणतो – मी वाघासारखा खंबीर

    EVM हॅक होऊ शकत नाही – निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

    निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, EVM स्टँडअलोन, टँपर-प्रूफ डिव्हाईस आहे. ते कोणत्याही ब्लूट्यूथ किंवा वायफाय अशा नेटवर्कशी कनेक्ट होऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टानेही ईव्हीएमवर सतत विश्वास दाखवला आहे. २०१९ नंतर पुन्हा एकदा नुकत्याच पार पडलेल्या २०२४ मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही शुजाने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मात्र निवडणूक आयोगाने त्याचे दावे खोटे असल्याचं सांगत ते फेटाळून लावले आहेत.

    विधानसभा निवडणुकीदरम्यान EVM हॅक झाल्याचा दावा, व्हायरल व्हिडिओनंतर मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई

    EVM खरंच हॅक होऊ शकतं का? या एक मोठा प्रश्न सध्या चर्चेत आहे. पण निवडणूक आयोगाने हे शक्य नसल्याचं म्हटलं आहे. पण शुजासारखे लोक सतत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याने नेमकं सत्य काय हे आता तपासानंतरच समोर येईल. पण खोट्या दाव्यांबाबतीत निवडणूक आयोग अतिशय कठोर असून असे खोटे दावे करणाऱ्या लोकांवर कारवाई करत आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed