Nandurbar Vidhan Sabha Nivadnuk Result : नंदुरबारमधील चारही मतदारसंघात महायुतीने मोठा विजय मिळवला असून काँग्रेसला धक्का बसला आहे. चार मतदारसंघात कशी झाली लढत? वाचा एका क्लिकवर.
तसंच राज्यातील प्रथम क्रमांकाचा मतदारसंघ असलेल्या अक्कलकुवामध्ये शिंदे शिवसेनेचे आमश्या पाडवी जायंट किलर ठरले. त्यांनी के.सी.पाडवी तसेच डॉ. हिना गावित यांचा पराभव केला. शहादा मतदारसंघात ही चुरस पाहायला मिळाली. येथे भाजपाचे राजेंद्र गावित विजयी झाले. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा एकमेव आमदार शिरीषकुमार नाईक दुसऱ्यांदा निवडून आले. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात महायुतीला एका जागेचा फायदा झाला असून काँग्रेसचे एक जागेचे नुकसान झाले आहे.
काकाला आयुष्यभर जमलं नाही ते पुतण्याने करून दाखवले, पुतण्याची भाजपात प्रवेश करत विधानसभेत बाजी
नंदुरबार विधानसभेत डॉ. विजयकुमार गावित सातव्यांदा विजयी
नंदुरबार विधानसभा मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपाने डॉक्टर विजयकुमार गावित यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघातून ते सातव्यांदा उमेदवार होते. तर काँग्रेसने किरण तडवी यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी लढत नव्हती. तर भाजपा विरुद्ध शिंदे शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली. नंदुरबार तालुक्यात चंद्रकांत रघुवंशी आणि डॉ. विजयकुमार गावित हे कट्टर विरोधक आहेत.
डॉ. विजयकुमार गावित यांचा पराभव करण्यासाठी चंद्रकांत रघुवंशी यांनी पूर्ण ताकद लावली होती. डॉ. गावित यांच्या विरोधात पूर्वाश्रमीचे त्यांचे सहकारी अभिजीत पाटील तसेच जयपाल रावल यांना सोबत घेत डॉ. गावित आणि विरुद्ध विविध ठिकाणी प्रचार सभा घेत विरोधात वातावरण निर्मिती करण्यात यश आले होते. मात्र शेवटच्या दोन दिवसात डॉ. विजयकुमार गावित यांनी प्रचार सभा घेत हिंदुत्वाचे कार्ड वापरत सर्वांना धोबी पछाड देत विजय मिळवला. डॉ. विजयकुमार गावित यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली ती अखेरपर्यंत वाढतच गेली. त्यांनी ७६ हजार २८७ मतांनी विजय प्राप्त केला.
निकाल धक्कादायक, महायुतीकडून धर्माचा-पैशाचा उपयोग राजकारणासाठी; पराभवानंतर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया
मिळालेली मते –
विजयकुमार गावित – भाजपा – १५५१९०
इंजी किरण तडवी – कॉग्रेस – ७८९४३
भाजपाच्या डॉ. विजयकुमार गावितांचा ७६२४७ मताधिक्याने विजय
अक्कलकुव्यात आमश्या पाडवी विजय
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात काँग्रेसचे के. सी पाडवी सात वेळेस विजयी झाले आहेत. त्यांना काँग्रेसने आठव्यांदा उमेदवारी दिली होती. ही जागा भाजपाला मिळावी अशी मागणी डॉक्टर हिना गावित यांनी केली. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत या जागेसाठी महायुतीचे अडले होते. अखेर अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदे शिवसेनेने विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांना शिंदे शिवसेनेतर्फे उमेदवारी दिली.
या मतदारसंघात भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्ता असलेल्या डॉ. हिना गावित यांनी पक्षाचा आणि पदाचा राजीनामा देत येथून अपक्ष उमेदवारी दाखल केली. तसेच माजी मंत्री पद्माकर वळवी यांनीही भारतीय आदिवासी पार्टीतर्फे उमेदवारी केली होती. त्यामुळे दोन माजी मंत्री, एक माजी खासदार आणि एक विद्यमान आमदार यांच्यामध्ये चुरशीचा सामना पहायला मिळाला. या हाय व्होल्टेज लढतीमध्ये सुरुवातीला के. सी. पाडवी तर कधी डॉ. हिना गावित आघाडीवर होते. अखेर अक्कलकुवा मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे आमश्या पाडवी यांनी ४८०० मतांनी विजय मिळवला.
Uddhav Thackeray : निकाल अनाकलनीय, महाराष्ट्र माझ्याशी असा वागेल वाटलं नव्हतं, ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
मिळालेली मते –
आमश्या फुलजी पाडवी – शिवसेना (शिंदेगट) – ७२४११
के.सी पाडवी – काँग्रेस – ६९१२२
डॉ. हिना गावित – अपक्ष – ६६७४६
पदमाकर वळवी – अपक्ष – ५०६६
शिवसेना (शिंदे गट) विधान परिषद आमदार आमश्या पाडवी यांचा ३२८९ मताधिक्याने विजयी झाले.
तळोदा मतदारसंघातून राजेश पाटील दुसऱ्यांदा विजयी
तळोदा विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपाने आमदार राजेश पाडवी यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. तर काँग्रेसने भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन आलेले राजेंद्रकुमार गावित यांना उमेदवारी दिली. त्यामुळे महाआघाडीतील घटक पक्षांमध्ये नाराजी पसरली होती. काँग्रेस तसेच राष्ट्रवादीतर्फे अपक्ष उमेदवारी दाखल करण्यात आली होती. या बंडखोरांना बनवण्यासाठी अर्ज माघारीचे शेवटच्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे हेलिकॉप्टरने नंदुरबार येथे आले होते. त्यांनी बंडखोरांची चर्चा केली. त्यानंतर अपक्ष उमेदवारांनी आपल्या अर्ज माघारी घेतले. तर राष्ट्रवादीचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी त्यांचे पुत्र भाजपाचे राजेश पाडवी यांचा प्रचार केला. राजेश पाडवी यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर ५३ हजार २०४ मतांनी विजय मिळवला.
नंदुरबारमध्ये महायुतीचा दबदबा, काँग्रेसला मोठा धक्का, एका क्लिकवर वाचा जिल्ह्यातील सर्व निकाल
मिळालेली मते –
राजेश पाडवी – भाजपा – १४६८३९
राजेंद्र गावित – कॉग्रेस – ९३६३५
गोपाल भंडारी – अपक्ष – २३९६
भाजपाच्या राजेश पाडवी यांचा ५३२०४ मताधिक्याने विजय
नवापूर मतदारसंघात पुन्हा काँग्रेस विजयी
नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे शिरीषकुमार नाईक यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे भाजपातून राष्ट्रवादीत आलेले भरत गावित यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू शरदकुमार गावित यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली. यामुळे या विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होती. शिंदे शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी युतीधर्म पाळत भरत गावित यांचा प्रचार केला. मात्र मतदानाच्या दोन दिवस आधी चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे उमेदवार शिरीषकुमार नाईक यांना मदत केली. त्याचा परिणाम म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार यांना पराभवाचा सामना करावा लागला.
Hemant Rasane wins Maharashtra Kasba Peth Assembly Election: कसबा पेठमध्ये भाजप गुलाल, हेमंत रासने विजयी तर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव
चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रत्येक विधानसभेमध्ये वेगवेगळी भूमिका घेतली. त्याचा फटका महायुतीला बसल्याचे चित्र आहे. नवापूर विधानसभा मतदारसंघासाठी आज मोजणी झाली. २४ फेऱ्यांमध्ये झालेल्या मतमोजणीत अपक्ष उमेदवार शरद गावित विजयी झाले होते. मात्र पोस्टल मतदानात काँग्रेसचे शिरीष नाईक यांना अधिकचे मते मिळाल्याने १ हजार १२१ मतांनी विजयी झाले.
मिळालेली मते –
शिरीषकुमार सुरपसिंग नाईक – कॉग्रेस – ८७१६६
शरद कृष्णराव गावित – अपक्ष – ८६०४५
भरत माणिकराव गावित – राष्ट्रवादी – ५६१७६
काँग्रेसच्या शिरीष नाईक यांचा ११२१ मताधिक्याने विजय झाला आहे.